Wednesday, July 3, 2024

‘या’ प्रसिद्ध गायिकेचे निधन, वयाच्या 64 वर्षी घेतला अखेरचं श्वास

ओडिशातील प्रसिद्ध भक्ती गायिका शांतीलता बारिक यांचे निधन झाले आहे. शांतीलता दीर्घकाळ कर्करोगाशी लढा देत होत्या. सोमवारी रात्री शांतीलता यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची माहिती देताना शांतीलता यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्या दीर्घकाळापासून कर्करोगाशी लढा देत होत्या आणि गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होत्या, त्यानंतर सोमवारी रात्री त्यांचे निधन झाले.

शांतीलता बारीक ओडिशातील प्रत्येक घराघरात परिचित होत्या. त्यांना बाळकृष्ण दास, मार्कंडेय महापात्रा, सिंघारी श्यामसुंदर कार आणि गोपाल पांडा यांसारख्या दिग्गजांनी प्रशिक्षण दिले. ‘ठका मन चला जिबा’, ‘भाजी भाजी तो नाम’, ‘हे चकनायन’, ‘बळीरेणू महाबंध’ अशी अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी गायली.

शांतीलता बारीक यांना भुवनेश्वर येथील उत्कल संगीत महाविद्यालयातून ‘आचार्य’ ही पदवी मिळाली. ओडिशा संगीत, भाषा आणि संस्कृतीत दिलेल्या योगदानाबद्दल ओडिशा संगीत नाटक अकादमीनेही त्यांचा गौरव केला. प्रसिद्ध भक्ती गायक यांच्या निधनाबद्दल मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले, शांतीलता यांच्यानंतर सांस्कृतिक जगतात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्याला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. यादरम्यान नवीन पटनाईक यांनी शांतीलता बारीक यांच्या पार्थिवावर पूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी घोषणा केली. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शोक व्यक्त करत त्यांच्या गाण्यात अध्यात्म आणि भक्तीची भावना असल्याचे सांगितले. त्यांनी संगीताच्या माध्यमातून लोकांना ओडिशा आणि श्री जगन्नाथ यांच्या संस्कृतीशी जोडले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुशांत ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेला दिलासा, इतके दिवस कारवाई होणार नाही
फूड डिलिव्हरी ॲपवर भडकली ट्विंकल खन्ना; म्हणाली, ‘शाकाहारी लोकांना शुद्ध आणि इतरांना अशुद्ध म्हणणे चुकीचे आहे’

हे देखील वाचा