Friday, November 15, 2024
Home बॉलीवूड निगेटिव्ह अर्थ असणाऱ्या गाण्यांबाबत गायक शानने व्यक्त केली चिंता; म्हणाला, ‘मी अशा संगीतापासून…’

निगेटिव्ह अर्थ असणाऱ्या गाण्यांबाबत गायक शानने व्यक्त केली चिंता; म्हणाला, ‘मी अशा संगीतापासून…’

आपल्या आवाजाने सर्व संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणजे शान. त्याच्या आवाजाने आज त्याला सर्वत्र ओळख मिळवून दिली आहे. शानचा असा विश्वास आहे की, संगीत नेहमी टेन्शन हलकं करण्याचं काम करत. संगीत ऐकणे हे खूप लाभदायक आहे. संगीत आपल्या आयुष्यात खूप महत्वपूर्ण आहे. निगेटिव्ह अर्थ असणाऱ्या गाण्यांपासून आपल्याला लांब राहिले पाहिजे. हे वक्तव्य त्याने आजकालच्या संगीताबाबत केले आहे. (Singer shan says I stay away from songs with negative connotations)

शान म्हणाला की, “संगीत पहिल्यापासूनच टेन्शन कमी करण्याचे काम करते. यासोबत ते आपली बदलत्या मूडमध्ये आणि बदलत्या परिस्थितीत देखील साथ देते. चांगले संगीत ऐकणे खूप गरजेचे आहे. जे संगीत तुमच्या आत नकारात्मक भाव निर्माण करतं, ते तुमच्यासाठी हानिकारक असते. ते तुमच्यामध्ये नकारात्मकता आणि आक्रमकता भरण्याचे काम करते. त्यामुळे या अशा प्रकारच्या संगीतापासून लांब राहा.”

कोरोना महामारीदरम्यान शानने संगीताबाबत असणाऱ्या जबाबदारी बाबत देखील भाष्य केले. तो म्हणाला की, “मला नेहमीच असं‌ वाटतं की, माझ्या संगीताचा माझ्या श्रोत्यांवर चांगला परिणाम पडावा. मी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना त्यांना एक छोटा संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तरुणांना ध्वनी, गीत आणि रचना याबाबत जागृत करणे देखील महत्वपूर्ण आहे. मी वेगवेगळ्या शैलीमध्ये पाऊल ठेवले. तरीही मी माझ्या सीमा पार करू शकत नाही. संगीताच्या माध्यमातून एक सकारात्मक बदल घडवणे, ही एका गायकाची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे.”

या दिवसात शान त्याचे नवीन ‘तेरा हिस्सा हूँ’ या गाण्यामुळे खूप चर्चेत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘फादर्स डे’च्या दिवशी त्याने याबाबत त्याच्या चाहत्यांना माहिती दिली होती. यूट्यूबवर त्याच्या या गाण्याला 1 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तो या गाण्याबद्दल खूप उत्साहित आहेत. त्याने सांगितले की, “मी काही महिन्यांपूर्वी माझे ‘तेरा हिस्सा हूँ’ हे गाणे लिहिले आणि बनवले होते. पण मी हे गाणे ‘फदर्स डे’ च्या दिवशी प्रदर्शित केले. कारण हे एक विचार करून लिहिले आहे. त्यामुळे मला असे वाटले की, या भावनेला संबोधित करण्याची आवश्यकता आहे. खूप उशीर होण्याआधी आई- वडिलांना त्यांच्या मुलांकडून सगळ्या प्राथमिक गरजा प्राप्त झाल्या पाहिजेत.”

शानच्या ‘तेरा हिस्सा हूँ’ या गाण्यामध्ये त्याचा मुलगा शुभ देखील दिसला होता. त्याने एक छोटे पात्र निभावले होते. त्याचे हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी त्याच्या या गाण्याचे कौतुक केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा