जॅकलिन फर्नांडिसने (Jacqeline Fernandez) तिच्या आगामी ‘बेसोस’ गाण्याचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्यात जॅकलिनसोबत क्रिकेटर शिखर धवन दिसणार आहे. पोस्टर शेअर करताना जॅकलिनने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही ‘बेसोस’ साठी तयार आहात का?’ तिने या गाण्याच्या टीझरची रिलीज तारीखही शेअर केली. पोस्टरमध्ये जॅकलीन आणि शिखरचा लूक पाहून चाहते खूप आनंदी दिसत होते.
‘बेसोस’ या गाण्यात शिखर धवन जॅकलिनसोबत नाचताना आणि अभिनय करताना दिसणार आहे. ‘बेसोस’ गाण्याचा टीझर उद्या म्हणजेच ६ मे २०२५ रोजी प्रदर्शित होईल. हा नवीन गाण्याचा ट्रॅक ८ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शित होईल. हा टीझर यूट्यूबवर प्रदर्शित होईल. हे गाणे गायिका श्रेया घोषाल आणि कार्ल वाईन यांनी गायले आहे.
‘बेसोस’चे पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांनी जॅकलिन फर्नांडिसच्या इंस्टाग्राम पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘पोस्टरमध्ये तुमचा आणि शिखरचा लूक पाहून आम्ही उत्साहित आहोत.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘पोस्टरमधून फंकी व्हायब्स येत आहेत.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘श्रेयाचा आवाज आणि तुझा डान्स, हे एक अद्भुत संयोजन आहे.’ ‘बेसोस’ बद्दल बोलायचे झाले तर, हा एक स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ चुंबन असा होतो.
या गाण्याव्यतिरिक्त, जॅकलिन फर्नांडिस ‘हाऊसफुल ५’ या कॉमेडी चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्याशिवाय एक मोठी स्टारकास्ट आहे. या चित्रपटातील एक गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले आहे, ज्यामध्ये जॅकलिनचा नृत्य प्रेक्षकांना आवडला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
एजाज खानच्या घरी पोहोचले मुंबई पोलीस; अभिनेत्यावर बलात्काराचा गुंग दाखल
मेट गालामध्ये शाहरुख खानने केले राज्य तर दिलजीतने रचला इतिहास, कियारा-प्रियंकासह या सेलिब्रिटींनीही जिंकले मन