Sunday, June 1, 2025
Home बॉलीवूड आपल्या आवाजाने प्रेक्षकांना वेड लावणारी श्रेया घोषाल, आता तिच्या सुंदरतेनेही करतेय चाहत्यांना घायाळ!

आपल्या आवाजाने प्रेक्षकांना वेड लावणारी श्रेया घोषाल, आता तिच्या सुंदरतेनेही करतेय चाहत्यांना घायाळ!

आपल्या सुमधुर आवाजाने लाखो रसिकांची मने जिंकणारी सुंदर गायिका श्रेया घोषाल सर्वांची आवडती आहे. तिने बॉलिवूडमधील बर्‍याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. अगदी लहान वयात श्रेयाने प्रसिद्धीच्या शिखराला स्पर्श केला. तिने आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये आवाज दिला आहे. याशिवाय गायिका सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय दिसते. तिच्याशी संबंधित अपडेट ती चाहत्यांना फोटो किंवा व्हिडिओच्या मार्फत देत राहते. नुकताच श्रेयाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

खरं तर , हा व्हिडिओ श्रेयाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये चाहत्यांना या सुंदर गायिकेच्या निरागस अदा पाहायला मिळाल्या. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. याशिवाय बॅकग्राऊंडला श्रेया घोषाल आणि टोनी कक्करने गायलेले ‘ओह सनम’ हे अल्बम गाणे वाजत आहे. गाण्याच्या लहरीसोबत श्रेयाचे केसही हवेत हलताना आपण पाहू शकतो.

अलीकडेच, श्रेयाने पांढऱ्या ड्रेसमध्ये एक फोटोही शेअर केला होता. यातही गायिकेची सुंदरता चाहत्यांना पाहायला मिळाली. अतिशय साध्या लूकमधील या फोटोलाही चाहत्यांनी खूप प्रेम दिले.

श्रेया लवकर आई होणार आहे. ही बातमी श्रेयाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. गायिका बेबी बंपसह सतत फोटो पोस्ट करताना दिसते.

साल २००० मध्ये आलेल्या ‘देवदास’ या चित्रपटाद्वारे श्रेया घोषालने संगीतसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात श्रेयाने एकूण ५ गाणी गायली, जी सुपरहिट ठरली. यातील ‘बैरी पिया’ गाणे विशेष गाजले. लता मंगेशकर यांना आपली प्रेरणा मानणाऱ्या श्रेया घोषालने, हिंदीव्यतिरिक्त बंगाली, तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी आणि भोजपुरी भाषेतही गाणी गायली आहेत. श्रेयाने २०१५ मध्ये शिलादित्य मुखोपाध्यायशी लग्न केले, जो तिचा बालमित्र होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दोन दिवसांतच भोजपुरी गाण्याने रचलाय युट्यूबवर विक्रम, राकेश मिश्राच्या गाण्याला चाहत्यांच्या मिळतायत जोरदार हिट्स

-प्रतीक्षा संपली! अखेर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, जबरदस्त ऍक्शनचा समावेश

-पहिल्यांदाच आशियाई सुपरहिरोवर मार्व्हल स्टुडिओने बनवला चित्रपट, तीनच दिवसात टिझरला मिळाले १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

हे देखील वाचा