Thursday, November 14, 2024
Home अन्य पहिल्यांदाच आशियाई सुपरहिरोवर मार्व्हल स्टुडिओने बनवला चित्रपट, तीनच दिवसात टिझरला मिळाले १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

पहिल्यांदाच आशियाई सुपरहिरोवर मार्व्हल स्टुडिओने बनवला चित्रपट, तीनच दिवसात टिझरला मिळाले १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

कॅलिफोर्नियातील मार्व्हल स्टुडिओचे नाव हे सगळ्यात यशस्वी स्टुडिओ म्हणून नावाजले गेले आहे. कोणत्याही यशस्वी फिल्म स्टुडिओसाठी काही पत्ते कायमच लववून ठेवले जातात. सुरुवातीपासूनच मार्व्हल स्टुडिओ या खेळाचे मास्टर होते. जेव्हा त्यांच्या दोन वेब सीरिज ‘वांडा व्हिजन’ आणि ‘द फाल्कन एँड द विंटर सोल्जर’ त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या परंपरेनुसार लोकप्रिय करण्यास अपयशी ठरले. मात्र, मार्व्हलने आणखी एक कॉमिक बुक सुपरहिरो शांग ची याला मैदानात उतरवले आहे. आशियाई कलाकार मुख्य भूमिकेत असलेला मार्व्हलचा हा पहिला चित्रपट आहे.

मार्व्हल कॉमिक्समध्ये रस असणार्‍या लोकांना शांग ची म्हणजे काय हे माहित आहे. पण जगातील कोणालाही माहित नाही की, त्याचा भूतकाळ कसा होता? मार्व्हलने या पात्रावरील पहिल्या चित्रपटात शांग चीकडून हा अस्पष्ट भूतकाळ विणण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचा टिझर अत्यंत नेत्रदीपक सुरू होतो. व्हॉईस ओव्हरमध्ये एक आवाज आहे, ज्यामध्ये एक वडील आपल्या मुलाला १०वर्षे देण्याविषयी बोलतात. मुलगा त्यांचा डावा हात असावा, अशी त्यांची इच्छा आहे. पण जोपर्यंत आवाज संपतो तोपर्यंत हे स्पष्ट होते की, असे काहीच होताना दिसत नाही.

‘शांग ची एँड द लिजेंड ऑफ टेन रिंग्ज’ चित्रपटाचा टिझर मार्व्हलच्या सुपरहिट चित्रपटांच्या धर्तीवर तयार करण्यात आला आहे. यामध्ये रहस्य आहे, थरार आहे आणि कुटुंब विखुरलेले आहे, आणि सुपरहिरोंच्या बालपणात त्रासदायक गोष्टी आहेत. स्पायडरमॅनप्रमाणे बालपणातील अपघात ही त्याची ओळख आहे. बॅटमॅनचे बालपणही काहीसे असेच आहे. असेच आता शांग चीचे बालपण आहे. त्याच्या बालपणामुळे त्याचे संपूर्ण तारुण्य बदलून टाकते.

या चित्रपटाचा नायक सीमू लियू आहे. मार्व्हल स्टुडिओने त्याच्या वाढदिवशी ‘शांग ची आणि द लिजेंड ऑफ टेन रिंग्ज’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित केला. टिझर काही तासांत १ कोटी २८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. येथे शांग चीच्या चित्रपटात तार्‍यांची पूर्ण सेना आहे. ऍक्वाफिना शांग ची याची मैत्रीण कॅटच्या भूमिकेत दिसणार आहे.

डेस्टिन क्रेटॉन दिग्दर्शित फिल्म ‘शांग ची एँड द लिजेंड ऑफ द टेन रिंग्स’ ३ सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मार्व्हल हळूहळू या वर्षाच्या चित्रपटांसाठी वातावरण तयार करत आहे. प्रेक्षकदेखील ‘ब्लॅक विडो’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रतीक्षा संपली! अखेर सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, जबरदस्त ऍक्शनचा समावेश

-फिट अँड फाईन! सारा अन् जान्हवीने लुटला मालदीवचा आनंद; एकत्रच केला वर्कआऊट

-दिल वाले दुल्हनियाच्या गॉंव की छोरीपासून ते टॉपच्या क्रिकेट अँकरपर्यंत मंदिरा बेदीच्या लूक्समधील ट्रान्सफॉर्मेशन

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा