Monday, July 1, 2024

‘सरकारणं माझ्या आईला पद्मश्री दिला पण …’, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या मुलाने व्यक्त केली खंत

आपल्या दमदार आवाजाने ठसकेबाज गितांनी ‘लावणी’ या लोकनृत्याला लोकप्रियता मिळवूण देणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या 89 व्या वर्षी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. त्यांनी आपल्या राहत्याघरी म्हणजेच गिरगाव फणसवाडी येथील निवासस्थानी शनिवारी (दि, 10 डिसेंबर) रोजी दिपारी 12 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूने अवघ्या महाराष्ट्रावर दु:खाचे वातारण पसरले आहे.

लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हान (Solochna Chavan) यांना प्रेमाने माई म्हणायचे आणि पुढे हेच नाव प्रचलित होत गेले. आणि त्यांना माई नावानेच लोक ओळखू लागले. त्यांच्या गायनाने लाणीला वेगळीच ओळख मिळायची. त्यांचा मुलगा विजय चव्हान यांनी नुकतंच सोशल मीडियवर एक पोस्ट शेअर केली असून पद्मश्री पुरस्कारावरुन सरकारवर टीका केली आहे.

विजय चव्हान (Vijay Chavan) यांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्या त्यांनी आपल्या आईविषयी बोलताना सांगितले की, “माझी आई ही माझी गुरू होती. आज ती मला सोडून गेली. ज्यावेळी लावणीला काहीही प्रतिष्ठा नव्हती, तेव्हा अत्यंत सन्मानाने ती लावणी गायची. त्याकाळी लावणीकडे ज्या वक्रदृष्टीने पाहिलं जायचं, तो दृष्टीकोन आईमुळे बदलला. तिने फडावरची लावणी घराघरात पोहोचवून लावणीला एक वेगळा मान मिळवून दिला.”

विजय चव्हान यांनी पुढे सांगितले की, “ सरकारनं काही वर्षांपूर्वी आईला पद्मश्री दिला. वयाच्या नव्वदीत असताना तिला हा पुरस्कार मिळाला, पण एकाच गोष्टीची खंत वाटते की, असे पुरस्कार कलाकारांना योग्य त्या वयात द्यायला हवेत. जेव्हा आईला हा पुरस्कार मिळाला त्यावेळी आईची स्मरणशक्ती पूर्णपणे गेली होती. हा पुरस्कार कशासाठी आणि कोणाकडून मिळतोय हे देखील तिला आठवत नव्हतं. आयुष्याच्या शेवटी हे असे पुरस्कार दिल्याने त्याचे काहीच किंमत राहत नाही, ही मोठी खंत आहे. त्यामुळे येत्या काळात कलाकारांचा योग्य सन्मान मिळेल एवढीच भावना व्यक्त करतो.”

सुलोचना चव्हान यांची वयामुळे स्मरणशक्ती कमी झाली होती. डॉक्टरांनी त्यांनी घरी हारण्याचा सल्ला दिला होता. 2022 रोजी सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. हा पुरस्कार स्वीकारताना त्यां व्हिलचेअरवर पोहोचल्या होत्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बोल्ड एँड ब्युटिफूल! जॅकलीन फर्नांडिसच्या लेटेस्ट फोटोशूटचा इंटरनेटवर राडा
राम गोपाल वर्मा यांनी पुन्हा केले वादग्रस्त ट्विट; म्हणाले, ‘अभिनेत्रीच्या कुत्र्याचे पाय चाटायला…’

हे देखील वाचा