टोनी कक्कर त्याच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याची गाणी तरुण वर्गाला खूप आवडतात. आजच्या काळात त्याची गाणी ही पार्टीचा जीव बनली आहेत. पण एक गोष्ट अशी आहे की, त्यांच्या गाण्यांच्या बोलांमुळे तो ट्रोल होत राहतो. पण तरीही टोनी कक्करचे प्रत्येक नवीन गाणे प्रदर्शित होताच हिट होते. गेल्या अनेक दिवसांपासून टोनी त्याच्या लव्ह लाईफबद्दलही चर्चेत आहे. चाहत्यांनी टोनीला त्याच्या गर्लफ्रेंड आणि लग्नाशी संबंधित प्रश्न अनेकदा विचारले आहेत. परंतु गायक नेहमीच या विषयावर मौन बाळगतो. त्याचवेळी आता त्याने या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आहेत.
अलिकडेच टोनी कक्करने (Tony Kakkar) एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये त्याने त्याच्या लग्न आणि लव्हलाईफशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यादरम्यान टोनी कक्करने सांगितले की, तो सध्या कोणाला डेट करत नाहीये. तो सध्या सिंगल आहे. या मुलाखतीत टोनी कक्करलाही लग्नाबद्दल विचारण्यात आले होते. यावर त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो संगीतात खूप व्यस्त आहे आणि त्याला लग्नाची घाई नाही आणि तो अजून लग्नासाठी तयारही नाही.
टोनी कक्करने आत्तापर्यंत अनेक स्टार्ससोबत काम केले आहे, त्यात निक्की तांबोळीचाही समावेश आहे. निक्की टोनी कक्करसोबत ‘नंबर लिख’ गाण्यात दिसली होती. या गाण्यानंतर त्यांच्या नात्याची अफवा उठली. मात्र, टोनी आणि निक्की तांबोळी यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
टोनी कक्करबद्दल सांगायचे, तर त्याने अनेक हिट गाणी दिली आहेत. ज्यात ‘लीला’, ‘धीमे धीमे’, ‘यारी है’, ‘गोवा बीच’, ‘तेरा सूट’, ‘कुर्ता पायजमा’ यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे. टोनी कक्करने त्याची बहीण नेहा कक्करसोबतही (Neha Kakkar) अनेक गाणी गायली आहेत. नेहा कक्कर ही एक लोकप्रिय बॉलिवूड गायिका आहे, जिने अनेक हिट गाणी गायली आहेत.
हेही वाचा :
- शाहिदच्या बहुचर्चित ‘जर्सी’ सिनेमाचे प्रदर्शन रद्द, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चित्रपटाच्या टीमचा निर्णय
- सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटासाठी ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा
- ट्विटरवर ‘अतरंगी रे’ विरोधात मोहीम, अक्षय-सारा अन् धनुषच्या चित्रपटावर ‘या’ गोष्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप