तर झाले असे की, रंजना यादव यांनी 2006 साली उदित नारायण (Udit Narayan) यांच्या पत्नी असल्याचा दावा केला होता. उदित नारायण यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. मात्र, त्यांनी मान्य न केल्याने रंजना नारायण कोर्टात पोहोचल्या. रंजना यांनी कोर्टात कागदपत्रे आणि फोटोंच्या स्वरूपात पुरावे सादर केले, जे पाहून कोर्टाने उदित नारायण यांना त्यांच्या दोन पत्नींसोबत राहण्याचे आदेश दिले. उदित नारायण यांनी आधीच विवाहित असूनही 1985 मध्ये दीपा नारायणशी लग्न केले होते.
उदित नारायण यांच्या फार कमी चाहत्यांना हे माहित असेल की, त्यांनी त्यांचे पहिले गाणे हिंदीत नाही, तर नेपाळी चित्रपट ‘सिंदूर’साठी गायले होते. उदित नारायण यांना त्यांच्या पहिल्या हिट गाण्यासाठी बॉलीवूडमध्ये तब्बल दहा वर्षे वाट पाहावी लागली. ते गाणं हाेतं ‘पापा कहते हैं.’ हे गाणे सुपरहिट झाले आणि उदित हे राताेरात स्टार झाले. हे गाणे 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कयामत से कयामत’ चित्रपटातील आहे. उदित यांची कारकीर्द या गाण्यातून बनायला सुरुवात झाली.
यानंतर उदित यांनी शाहरुख खान (Shahrukh Khan), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), आमिर खान,(Aamir Khan), अजय देवगण (Ajay Devgn) यांच्यासह अनेक कलाकारांच्या चित्रपटांमध्ये आपल्या सुरेल आवाजाची जादू पसरवली. गायकाने केवळ हिंदीच नाही, तर तमिळ, बंगाली, भोजपुरी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत आणी आजही ते सिनेसृष्टीत सक्रिय आहेत.
अधिक वाचा-
–हाय गर्मी! 37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीचा मादक लूक… पाहा खास फोटो
–‘जन्माला आली तशीच…’, उर्फीने खिडकीत थांबून ‘तसला’ फोटो शेअर करताच भडकला चाहता