Monday, July 15, 2024

‘सगळा चित्रपटच खोटा…’, ‘लालसिंग चड्ढा’ फ्लॉप ठरल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी आमिर खानची उडवली खिल्ली

आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फसला आहे. जोरदार प्रमोश करुनही चित्रपट कमाईच्या बाबतीत काही आश्चर्यकारक करू शकला नाही. आमिरच्या चित्रपटाबाबत अनेकजण आपली वेगवेगळी मते देत आहेत. आता ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी लाल सिंग चड्ढा यांच्या अपयशावर आमिर खानची खिल्ली उडवली आहे. काय म्हणाले आहेत ते नेमके चला जाणून घेऊ.

बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. काश्मिर फाईल्स चित्रपटाच्या जोरदार यशानंतर ते चांगलेच प्रसिद्धी झोतात आले आहेत. नुकतेच त्यांनी आमिर खानच्या लालसिंग चड्ढा चित्रपटावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. विवेक अग्निहोत्रीने लाल सिंग चड्ढाच्या खराब बॉक्स ऑफिसवर आपले मत व्यक्त केले की, बहिष्काराच्या ट्रेंडमुळे चित्रपटाने बाजी मारली नाही, परंतु लोकांनी आमिर खानमध्ये कमी सत्य पाहिले आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी प्रश्न विचारताना सांगितले “लाल सिंग चड्ढाचे उदाहरण घ्या, मला आशा आहे की आमिर खानने ते ऐकले असेल आणि ते समजून घेतले असेल. इंडस्ट्रीतील प्रत्येकजण म्हणत आहे की, भक्तांनी चित्रपटाचे नुकसान केले आहे. पण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना किती मते मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का? 40 टक्के, बरोबर? मग आता मला सांगा बाकीचे 50 टक्के लोक कुठे आहेत?”

विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले की, बहिष्काराचा ट्रेंड कायम राहिला असला, तरी त्याच्या खऱ्या चाहत्यांनी हा चित्रपट पाहायला हवा होता. जर त्याचा चाहता वर्ग त्याच्याशी एकनिष्ठ नसेल तर त्याने चित्रपटांसाठी 150-200 कोटी रुपये घेऊ नयेत. तुमच्याकडे निष्ठावान प्रेक्षक नसल्यास याचा अर्थ सर्वकाही खोटे आणि फसवणूक होते. तुम्ही लोकांना मूर्ख बनवत होता. मग तुम्ही 150-200 कोटी रुपये का घेत आहात?

दंगल हिट झाल्याबद्दल बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की “दंगल आणि पद्मावत दरम्यान बहिष्काराचा ट्रेंड अधिक हिंसक होता. असे असले तरी दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दंगल हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे कारण त्या चित्रपटात आमिर खानचे सत्य प्रेक्षकांना दिसले. चित्रपटात आमिर बाप झाला, भूमिकेसाठी वजन वाढवले, लोकांनीही चित्रपट पाहिला. पण तुम्ही मला सांगू शकाल का की लालसिंग चड्ढा काय आहे? हे कुणाला माहीतही नाही.”

हेही वाचा  – ‘मी मुले दत्तक घेऊ शकतो नाहीतर…’ नंदिता मेहतानीसोबत लग्न ठरल्यानंतर विद्युत जामवालने केला मोठा खुलासा
अक्षय कुमार आणि कपिल शर्माचे बिनसले? म्हणाला, ‘तू नजर लावल्याने सिनेमे फ्लॉप होतायेत’
आर माधवनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ, तुम्हीही पोट धरुन हसाल

 

हे देखील वाचा