Wednesday, July 3, 2024

फटाके वाजवा रे! गायक अरमान मलिक आणि आशना श्रॉफ यांचा साखरपुडा संपन्न, फोटो व्हायरल

सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रेटी त्याच्या आयुष्याती सर्वांत म्हत्वाचा टप्पा म्हणजे लग्न. अनेकदा जोडीदार चांगला मिळला नाही की, आयुष्यात खूप गोंधळ होतो. अनेक चाहत्याने त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या जोडीदारविषयी माहिती घ्यायला खूप आवडते. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड कलाकार विवाह बंधनात अडकत आहेत. तर काही कलाकारांचे साखरपुडा झाल्याच्या बातम्या येत आहेत. अशातच आता प्रसिद्ध गायक अरमान मलिकच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अरमान मलिकने त्याच्या साखरपुढ्याचे फोटो शेअर करून त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अरमान मलिकने ( Armaan Malik) एंगेजमेंट केली आहे. त्यांच्या एंगेजमेंटचे फोटोही समोर आले आहेत. त्याने 8 ऑगस्ट 2023 रोजी युट्युबर आणि ब्लाॅगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आशना श्रॉफसोबत एंगेजमेंट केले. दोघंही लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. अरमान मलिकने स्वत: सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर करत एंगेजमेंटची गोड बातमी दिली आहे. हे फोटो काही वेळातच खूप व्हायरल झाले आहेत.

28 वर्षीय अरमान मलिकने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना लिहिले की, “आमचा कायम स्वरूपी एकत्र राहण्याचा प्रवास सुरू झाला आहे.” या फोटोंमध्ये, अरमान आशना श्रॉफला एंगेजमेंट रिंग घालताना दिसत आहे. त्याचवेळी तो आशनाला गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज करतानाही दिसत आहे. या फोटोमध्ये आशना श्रॉफने पाढंऱ्या रंगाचा फ्लाॅवर डिझाईन असलेला शाॅर्ट ड्रेस परिधान केला आहे. तर अरमान मलिक पाढंऱ्या रंगाचा सुट घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ARMAAN MALIK ???? (@armaanmalik)

यादरम्याने आशना श्रॉफ विषयी बोलायचं झाले तर, तिला एक प्रसिद्ध युट्युबर आणि ब्लॉगर, सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणून ओळखली जाते. ती फॅशन आणि सौंदर्याशी संबंधित ब्लाॅग बनवते. अरमान मलिकने ‘जेहर’, ‘बोल दो ना जरा’, ‘पहेला प्यार’, ‘मुझको बरसात बना लो’ ते ‘मैं राहून या ना राहून’ अशी अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. तो एक प्रसिद्ध गायक आहे. (Singers Armaan Malik and Aashna Shroff’s sugarpuda photos viral)

अधिक वाचा- 
‘गदर 2’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; 17व्या दिवशी जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
‘असा’ आहे अभिनेता एजाज खानचा सिनेसृष्टीतील प्रवास; तब्बल 50 मालिकांमध्ये केले काम

हे देखील वाचा