Tuesday, June 6, 2023

अरमान मलिकच्या दोन्ही पत्नींनी दाखवले त्यांचे मास्टर बेडरूम; म्हणाल्या, ‘आम्ही सर्वजण आता एकत्र…’

प्रसिद्ध युट्यूबर आणि व्हिडिओ क्रिएटर अरमान मलिक हा नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या दोन्ही पत्नी क्रितिका मलिक आणि पायल मलिक यांच्यामुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. कारण, त्याच्या या दोन्ही पत्नी लवकरच आई बनणार आहेत. मागील काही दिवसांपूर्वीच त्यांच्या प्रेग्नंसीची बातमी समोर आली आहे. या दोघी एकसोबत प्रेग्नंट झाल्यामुळे त्यांना जोरदार ट्रोलही करण्यात आले होते.

अशात अरमान मलिकचे युट्यूब व्हिडिओ, रील्स मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहेत. आता त्याच्या युट्यूब चॅनेलवर पत्नी क्रितिका आणि पायल यांचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्या त्यांच्या नवीन घराची झलक दाखवताना दिसत आहेत. तसेच, त्यांनी त्यांच्या भल्यामोठ्या कस्टमाईज्ड बेडरूमचीही झलक दाखवली आहे.

काय आहे व्हिडिओत?
या व्हिडिओत क्रितिका मलिक आणि पायल मलिक (Kritika Malik And Payal Malik) सांगत आहेत की, त्या प्रेग्नंसीशी संबंधित चाचण्या आणि स्कॅन करण्यासाठी डॉक्टरांकडे गेल्या होत्या. क्रितिका तिची औषधेही दाखवते. यानंतर क्रितिका आणि पायल त्यांच्या घराची थोडीफार झलक दाखवत संपूर्ण घर दाखवण्यास नकार देतात. मात्र, त्या त्यांची सर्वात आवडती जागा प्रेक्षकांना दाखवताना दिसत आहेत.

क्रितिका आणि पायल यांची खास जागा त्यांचे शानदार बेडरूम आहे. यामध्ये एक कस्टमाईज्ड बेड आहे. पायल म्हणते की, हा बेड त्यांनी कस्टमाईज्ड केला आहे. जेणेकरून त्यांचे संपूर्ण कुटुंब म्हणजेच ती, क्रितिका, अरमान आणि त्यांचा मुलगा येथे झोपू शकेल. त्यांनी बेडसमोर एक आरसाही लावला आहे. त्या आरशावर लाईटही दिसत आहे.

या व्हिडिओत क्रितिकी म्हणते की, “हा मास्टर बेड आम्ही खास ऑर्डर देऊन बनवला आहे. जेणेकरून आम्हा सर्वांना इथे झोपता येईल. पहिल्या घरात इकडे-तिकडे झोपावे लागायचे. कारण, तिथे लहान बेड होते.” यानंतर ती सांगते की, “त्यांनी गादीही खास ऑर्डर देऊन बनवली आहे. त्यामुळे सर्व लोक येऊ शकतील. कारण आम्ही अनोखे आहोत आणि आमचे कुटुंबही अनोखे आहे.” पुढे सांगताना पायल म्हणते की, “लवकरच त्यांचे कुटुंब मोठे होणार आहे. त्यामुळे त्यांनी हे बेड बनवले आहे.”

एक महिन्याआधी अपलोड केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 13 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून असे म्हणता येऊ शकते की, क्रितिका आणि पायल यांनी त्यांच्या येणाऱ्या बाळासाठी आधीपासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘खोटं का बोलतोय राम?’, अभिनेत्याने स्वत:ला म्हटले नेहा कक्करचा फॅन, युजर्सनी पाडला कमेंट्सचा पाऊस
धक्कादायक! महेश मांजरेकरांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल, माढा कोर्टाने दिले चौकशीचे आदेश

हे देखील वाचा