Sunday, October 1, 2023

‘असा’ आहे अभिनेता एजाज खानचा सिनेसृष्टीतील प्रवास; तब्बल 50 मालिकांमध्ये केले काम

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 14′ मध्ये झळकलेला प्रसिद्ध अभिनेता एजाज खान होय. एजाज खानला 2011 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई विमानतळावर एका ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले होते. त्यावेळा तो खूप चर्चेत आला होता. एजाज खानचा चाहता वर्ग फार मोठा आहे. एजाज खानने अभिनयाच्या जोरावर खुप प्रसिद्धी मिळवली आहे. त्याने खूप मेहनत करून इथपर्यंताचा प्रवास केला आहे. चला तर मग जाणून घेऊया.

एजाज खानचा (eijaz khan) जन्म 28 ऑगस्ट 1975 रोजी हैदराबादमध्ये झाला आहे. त्याला आज कोणत्याही ओळखेची गरज नाही. त्याने मेहनतीच्या जोरावर यश मिळवल आहे. एजाज खान सोमवारी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. एजाज खान अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांपासून केली होती. मात्र, त्यानंतर टीव्हीच्या दुनियेत त्याने खूप नाव कमावले. एजाज खान पहिल्यांदा 1999 मध्ये अजय देवगण आणि तब्बू स्टारर ‘तक्षक’ या चित्रपटात दिसला होता.

यानंतर एजाज खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नंतर तो छोट्या पडद्याकडे वळले. त्याने जवळपास 50 टीव्ही शोमध्येही काम केले आहे. एजाज खानने अभिनयाच्या जगात प्रचंड नाव कमावले, पण खऱ्या आयुष्यात त्यांने खूप संघर्ष केला आहे. तो फक्त तीन वर्षांचा असताना त्याचे पालक विभक्त झाले. यानंतर एजाजची बहीण त्याच्या आईसोबत हैदराबादमध्ये राहू लागली, तर तो भाऊ आणि वडिलांसोबत मुंबईला गेला. 1991मध्ये एजाजच्या आईचे निधन झाले. तेव्हा तो त्याच्या बहिणीला पहिलांदा भेटला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Eijaz Khan (@eijazkhan)

 एजाज खानने टीव्हीच्या दुनियेत प्रचंड नाव कमावले. त्याने एकता कपूरचा शो ‘काव्यांजली’, ‘क्या होगा निम्मो का’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ सारख्या अनेक शोमध्ये काम केले. प्रत्येक घराघरात त्याने आपला ठसा उमटवला आहे. याशिवाय एजाज खानने बिग बॉस सीझन 14 मध्ये भाग घेतला, ज्यामुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. एजाज खानला खरे प्रेम फक्त ‘बिग बॉस 14’ मध्येच मिळाले. (Read about birthday space actor eijaz khan journey in the film industry)

अधिक वाचा- 
अभिनेत्यासोबत एक व्यावसायिक देखील आहे करणसिंग बोहरा, ‘या’ ब्रँडचा आहे मालक
अंगुरी भाभी बनून शिल्पा शिंदेने केली प्रेक्षकांवर जादू, पटकावलाय मिस इंडियाचा किताब

हे देखील वाचा