Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘इंडियन आयडल १२’मधून ‘हा’ स्पर्धक बाहेर; म्हणाला, ‘हे माझे स्वप्न आहे आणि नक्की पूर्ण करेल’

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि चर्चेत असलेला सिंगिंग रियॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल’ होय. या शोचे सध्या १२ वे पर्व सुरू आहे. दर आठवड्याला दिग्गज गायकांची थीम आपल्याला या शोमध्ये पाहायला मिळते. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी यांची स्पेशल थीम ठेवली होती. यामध्ये मुख्य पाहुणे म्हणून संगीतकार आनंदजी आले होते. त्यांनी सर्व स्पर्धकांच्या गाण्यांचे कौतुक केले आणि आपले जुने किस्सेही ऐकवले. तरीही या एपिसोडमध्ये एक धक्कादायक एलिमिनेशनही पाहायला मिळाले, ज्याने स्पर्धकांना हैराण करून टाकले. एपिसोडमध्ये कमालीचा परफॉर्मन्स देणाऱ्या एका स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. एलिमिनेशनमध्ये त्या स्पर्धकाचं नाव घेतल्यानंतर स्पर्धक खूपच निराश झाले होते. (Singing Show Indian Idol 12 Kalyanji Anandji Special Episode Sawai Bhatt Got Eliminated)

शोचा होस्ट आदित्य नारायणने दोन स्पर्धकांना एलिमिनेशनसाठी स्टेजवर बोलावले. त्याने पहिले नाव सवाई भट्टचे नाव घेतले आणि त्यानंतर त्याने पवनदीप राजनचे नाव घेतले. यानंतर आदित्य म्हणाला की, “आज आणि कालचा परफॉर्मन्स पाहून परीक्षकांनी जो निर्णय घेतला आहे, त्याआधारे जो स्पर्धक आज इंडियन आयडलची ट्रॉफी जिंकण्यापासून दूर होणार आहे, त्याचे नाव आहे सवाई भट्ट.”

सवाई भट्टने या खास एपिसोडमध्ये ‘डॉन’ चित्रपटातील ‘ये है बंबई नगरिया’ हे गाणे गायले होते. राजस्थानचा रहिवासी असलेल्या सवाई भट्टच्या परफॉर्मन्सवर आनंदजी यांनी म्हटले की, “तुम्ही खूप चांगले गायले आणि मनसोक्तपणे गायले. दुसरा अंतराही चांगला होता. यामध्ये काय सांगण्यात आले आहे की, मुंबईत कोण कोणते लोक येतात?” यावर सवाई म्हणाला की, “पाहा लांबून लांबून इथे पैज लावण्यासाठी येतात.” यावर पुढे आनंदजी म्हणतात की, “पाहा इथे सर्व स्पर्धक आले आहेत पैज लावायला.”

सवाई भट्टचा प्रवास इथेच संपला. जाता जाता तो म्हणाला की, “इंडियन आयडल हा खूप मोठा मंच आहे आणि या मंचावर मला गाण्याची संधी मिळाली. लोकांचे स्वप्न असते इथे येण्याचे. गाणे कशाप्रकारे गायले जाते आणि यांसारखे अन्य बऱ्याच गोष्टी इथे शिकायला मिळाल्या. हे माझे स्वप्न आहे आणि मी हे नक्की पूर्ण करेल.”

खरं तर या शोमधील दुसरी स्पर्धक शनमुखप्रियाही प्रेक्षकांच्या निशान्यावर होती. अनेकदा चाहत्यांनी या शोच्या निर्मात्यांवर शनमुखप्रियाला बाहेर काढण्याची मागणीही केली होती. एवढेच नव्हे, तर शनमुखप्रियाने असेही म्हटले होते की, तिच्यावर या आठवड्यात चांगला परफॉर्मन्स करण्याचा ताण आहे. दुसरीकडे सवाई भट्ट या आठवड्यात स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

काही दिवसांपूर्वी सवाईने आपल्या परफॉर्मन्सने केवळ प्रेक्षका आणि परीक्षकांचाच नाही, तर आपल्या वडिलांचेही मन जिंकले होते. त्यांचे गाणे ऐकून वडीलही भावुक झाले होते. त्यांनी म्हटले होते की, “मी कधीच सवाईला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी आपल्या मुलाच्या प्रतिभेची साथ दिली नाही. मला फक्त वाटायचे की, तो काहीच करत नाही गाणे गात आहे. मात्र, आज जगभरात त्याची लोकप्रियता पाहून मला खूप अभिमान वाटत आहे.”

यासोबतच मंचावर त्यांनी आपला मुलगा सवाई भट्टला पगडी दिली होती. या गोष्टीने सर्वांची मने जिंकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद

-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा

-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री

हे देखील वाचा