Sunday, June 23, 2024

‘सोनू निगम’सोबत झालेल्या भांडणावर स्वप्नीलच्या बहिणीचा मोठा खुलासा, सांगितले घटनेचे सत्य

मुंबई येथील चेंबूर मध्ये लाइव्ह कॉन्सर्ट होता. हा लाइव्ह कॉन्सर्ट संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना गायक ‘सोनू निगम’ याला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. गायक सोनू निगम याचा लाइव्ह कॉन्सर्ट होता तो संपल्यानंतर जेव्हा स्टेजवरून खाली उतरत असताना त्याच्यासह त्याचे सुरक्षारक्षक हिर आणि रब्बानी यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गायक सोनू निगम (singer sonu nigam) याचा लाइव्ह कॉन्सर्ट होता तो संपल्यानंतर जेव्हा स्टेजवरून खाली उतरत असताना त्याच्यासह त्याच्या सोबत हिर आणि रब्बानी यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सेल्फी घेण्यावरून हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या धक्काबुक्कीच्या घटनेत गायकाला धक्का बुक्की करत असल्याचे लक्षात येतातच त्याचे सुरक्षारक्षक हिर आणि रब्बानी यांनी त्याला वाचवण्यासाठी आले. परंतु ते दोघेही त्या धक्काबुक्कीमुळे खाली पडले. गायकही पायऱ्यांवरून खाली पडला. तसेच त्याच्या सोबत असलेल्या सुरक्षारक्षकांना धक्का दिल्याने ते दोघेही स्टेज वरून खाली पडले. त्यांपैकी रब्बानी याला दुखापत झाली आहे. रब्बानी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गायक सोनू निगम याचा मुंबईमधील चेंबूर येथे एका म्युझिक शो दरम्यान धक्का बुक्की झाली. जेव्हा गायक त्याचा शो संपून स्टेजवरुन खाली येत असताना त्याला व त्याच्या सुरक्षकांना धक्का बुक्की दरम्यान दुखापत झाली. धक्का बुक्की केल्याप्रकरणी आमदार प्रकाश फाटेरपेकर यांचा मुलगा स्वप्नील फाटेरपेकर याला आरोपी मानले जात आहे. त्यामुळे त्याच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. चेंबूर पोलिसांनी चौकशीसाठी बोलवण्यात येईल. आमदार प्रकाश फाटेरपेकर यांनी हा शो आयोजित केला होता. आता त्यांची मुलगी सुप्रदा फाटेरपेकर हीने समोर येऊन झालेल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

सुप्रदा फाटेरपेकर हीने सांगितले की, हि सगळी घटना घाईमध्ये असल्यामुळे झाली. तिच्या भावाचा म्हणजेच स्वप्नीलचा कोणालाही दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. ती पुढे म्हणाली माझा भाऊ सोनू निगम याच्या सोबत एक सेल्फी घ्यायचा होता. पण हे सर्व करत असताना सोनू निगम याच्या बॉडीगार्डसोबत वाद विवाद झाला. ही फक्त एक फॅन मोमेंट होती. जे चुकीच्या पद्धतीने झालं. झालेल्या घटनेमुळे आम्ही सोनू निगमची माफी ही मागितली. (sister-of-swapnil-phaterpekar-suprada-phaterpekar-talks-about-the-incident-aatck-singer-sonu-nigam-in-music-show-chembur-in-mumbai)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
viral video sonu nigam : धक्कादायक! मुंबईत म्युझिक कार्यक्रमादरम्यान सोनू निगमवर झाला हल्ला
‘या’ शुल्लक करणासाठी सोनू निगमवर आमदाराच्या पोराचा हल्ला, पोलीस तक्रार करताना केला खुलासा

हे देखील वाचा