Tuesday, June 18, 2024

धर्मेंद्र सलमानला म्हणाले ‘माझ्यावरच गेलाय माझा लेक…’, त्यावर भाईजानची भन्नाट प्रतिक्रिया, व्हिडिओ पाहाच

धर्मेंद्र वयाच्या 87 व्या वर्षी ‘ताज’ या वेब सीरिजमधून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहेत. ते बर्याच काळापासून कोणत्याही चित्रपटात दिसले नसले तरी रिअॅलिटी शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावत असतात. यासाेबतच ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी आणि जवळच्या मित्रांशी संवाद साधतात, परंतु याच दरम्यान त्याचा एक जुना व्हिडिओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये ते सलमान खानला आपला मुलगा म्हणत आहे.

हा व्हिडिओ ‘बिग बॉस’च्या मागील सीझनचा आहे, ज्यामध्ये धर्मेंद्र गेस्ट म्हणून आले होते. व्हिडिओमध्ये धर्मेंद्र खुर्चीवर बसलेले दिसत आहेत, तर सलमान खान जमिनीवर त्यांच्या जवळ बसून बोलत आहे. सलमान त्याच्या आवडत्या अभिनेत्याला म्हणतो, “तुम्हाला पुढच्या सीझनमध्ये पुन्हा यावे लागेल.’ यावर धर्मेंद्र म्हणतो, ‘मी नक्की येईन, तुझ्यावर प्रेम जे करतो. माझा मुलगा आहेस तू अगदी माझ्यावर गेला आहेस. आनंदी राहा बेटा, तुझ्यावर प्रेम आहे.” धर्मेंद्र एवढे बाेलताच सलमान खान जोरजोरात हसायला लागताे.

धर्मेंद्र आणि सलमान खान त्यांच्या अफेअर्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहतात. धर्मेंद्र या गाेष्टीला खूप चांगल्याने समजतात, म्हणूनच ते सलमान खानला आपला मुलगा म्हणतात. या दोन्ही स्टार्समधील रंजक संवाद लोकांना आवडला आहे आणि ते या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

लोक धर्मेंद्र यांच्या उत्साहाचे कौतुक करत आहेत. कारण, वयाच्या 87 व्या वर्षीही ते चित्रपट आणि शोमध्ये काम करत आहे. धर्मेंद ‘ताज’ या वेबसिरीजशिवाय करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातही लवकरच दिसणार आहेत. ‘रॉकी आणि रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंग आणि आलिया भट्टसोबत धर्मेंद्र आणि शबाना आझमी हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.(viral social dharmendra calls salman khan his son on bigg boss said mera beta hai tu mujh par gaya hai tiger 3 actor funny reaction watch viral video )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील अभिनेता आयुष्मान खुराना झाला ‘युनिसेफ इंडिया’चा ब्रँड एम्बेसिडर
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

हे देखील वाचा