‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक आर.एस.प्रसन्ना यांनी या चित्रपटाबद्दल 5 खास गाेष्टी सांगितल्या आहेत. या गाेष्टी एवढ्या छान आहेत की, तुम्ही त्या वाचल्यानंतर नक्कीच हा चित्रपट पाहायला उत्सुक व्हाल ! ‘सितारे जमीन पर’ बनवणारे बनवणारे दिग्दर्शक आर.एस.प्रसन्ना बॉलीवुडमध्ये काहि नवीन नाहीत. त्यांनी 2017 साली ‘शुभ मंगल सावधान’ हा मजेशीर चित्रपट बनवला हाेता. आणि त्याच्या आधीच, म्हणेज चार वर्षांपूर्वी त्यांनी ‘कल्याण समयाल साधम’ नावाच्या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून सुरूवात केली हाेती. त्यामुळेच त्यांनी आपलं टॅलेंट सगळ्यांना दाखवून दिलं हाेतं.
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट का बघावा? दिग्दर्शक आर.एस.प्रसन्ना यांनी यांनी दिलेत खास कारणं !
‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट बनवणारे आर.एस.प्रसन्ना काहि नवीन नाहीत. त्यांनी 2017 साल मध्ये ‘शुभ मंगल सावधान’ हा भन्नाट चित्रपट बनवला हाेता. त्याच्याही आधीच त्यांनी ‘कल्याण समयाल साधम’ नावाचा तमिळ चित्रपट, दिग्दर्शित केला हाेता आणि तिथूनच त्यांनी सुरूवात केली हाेती.
मजेशीर गाेष्ट म्हणजे ‘शुभ मंगल सावधान’ हा त्या तमिळ चित्रपटाचाच हिंदी रिमेक हाेता. या दाेन्ही चित्रपटांचा विषय हाेता, पुरुषांमध्ये येणारी वैयक्तिक समस्या ‘इरेक्टाइल डिसफंक्शन’. अशा संवेदनशील विषयावर भारतात फार कमी चित्रपट झालेत, पण त्यांनी ते विषय खूप छान पद्धतीने मांडले. आता ते ‘सितारे जमीन पर’ घेऊन आले आहेत आणि ट्रेलर बघूनच लक्षात येतं की, यावळेही त्यांनी हटके आणि स्पेशल विषय निवडलाय, डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांची गोष्ट.
सर्वात छान गोष्ट म्हणजे, यामध्ये आमिर खान त्यांच्यासोबत आहे. आमिर हा असा कलाकार आहे जो नेहमी समाजाला विचार करायला लावणारे चित्रपट करतो. त्यामुळे या दोघांची जोडी म्हणजे धमालच म्हणूनच, ही गोष्ट ऐकल्यावर कोणीही हा चित्रपट बघण्याचं चुकवणार नाही!
दिग्दर्शक प्रसन्ना म्हणाले की, आर. के. नारायण आणि प्रेमचंद यांसारख्या लेखकांच्या कथा मनाला भिडतात, म्हणूनच त्या खास वाटतात. त्यांनी असंही सांगितलं की, ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाची गोष्टसुद्धा अशीच आहे, जी लोकांना जोडते, हसवते आणि हलवतेसुद्धा. मला ही गोष्ट खूप भावली, म्हणूनच मी हा चित्रपट केला. या चित्रपटात एक अशी भावना आहे, जी थेट हृदयाला स्पर्श करते.
आमिर खान आणि प्रसन्ना ही जोडी खूप खास आहे कारण, दोघंही वेगळे आणि मनाला भिडणारे विषय निवडतात. अशी जोडी खूप वर्षांनी बघायला मिळते जिथे दिग्दर्शक आणि अभिनेता एकसारखं विचार करणारे असतात. जेव्हा आम्ही प्रसन्नांना आमिर खानबद्दल विचारलं, तेव्हा त्यांनी एका छोट्याशा ओळीत खूप मोठं आणि मनापासूनचं उत्तर दिलं. ते म्हणाले, “मी आमिर सरकडून खूप काही शिकलोय. खरं सांगायचं तर मी ज्या शाळेत शिकतोय, त्या शाळेचे प्रिन्सिपलच आमिर सर आहेत!”
आर. एस. प्रसन्ना म्हणाले, “आमिर सरसोबत काम करणं म्हणजे एकदम धमाल अनुभव होता. ते अशा प्रकारचे कलाकार आहेत, जे प्रत्येक दिग्दर्शकाचं स्वप्न असतात.” जेव्हा त्यांना विचारलं की आमिर सर खूपच परफेक्ट असतात म्हणून कामात खूप सीरियस असतात का, तेव्हा प्रसन्ना हसून म्हणाले, ” ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ हे नाव तितकंसं बरोबर नाही. खरंतर ते प्रत्येक सीनमध्ये काहीतरी जादू शोधतात. त्यामुळे त्यांच्या सोबत काम करताना मजा येते आणि हो, ते कामाबाबत खूपच समर्पित असतात.”
ते पुढे म्हणाले, “बर्याच लोकांना वाटतं की, ते फार सीरियस असतात, पण खरं सांगायचं तर ते खूप फ्रेंडली आहेत. शूटिंगदरम्यान सेटवर एकदम मस्त आणि मजेशीर वातावरण होतं, अगदी ट्रेलरमध्ये जसं दिसतं तसंच!” जेव्हा आम्ही प्रसन्ना सरांना विचारलं की, या चित्रपटाला ‘तारे जमीन पर’चा स्पिरिच्युअल सिक्वेल म्हणजेच दुसरा भाग का म्हटलं जातंय, तेव्हा त्यांनी एकदम सोप्या शब्दात सांगितलं, “या नव्या चित्रपटात गोष्ट वेगळी आहे, पात्रं वेगळी आहेत, पण जी भावना ‘तारे जमीन पर’ मध्ये होती, तीच भावना या चित्रपटातसुद्धा आहे. त्यामुळेच तो त्या चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वेल आहे.”
ते पुढे म्हणाले, “या चित्रपटातसुद्धा आपण जुन्या चित्रपटासारखंच भेदभावावर सवाल केला आहे म्हणजेच, कोणत्याही वेगळेपणामुळे एखाद्याला वेगळं वागवणं योग्य नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे”. शेवटी प्रसन्ना सरांनी त्यांच्या पत्नीसोबत घरी झालेली एक खूप छान गोष्ट सांगितली, जी या चित्रपटाशी जोडलेली होती. ते म्हणाले, “माझ्या बायकोने मला एक दिवस म्हटलं, ‘ही फक्त एक फिल्म नाहीये, ही एक ऊर्जा आहे. तू जे ‘सितारे’ घेऊन काम करतो आहेस, त्यांच्याकडून तुला ती एनर्जी मिळतेय.’”
ती पुढे म्हणाली, “तुझ्यासोबत काम करणारे जे ‘सितारे’ आहेत, म्हणजेच जे डाऊन सिंड्रोम असलेली मुलं आहेत, त्यांच्यात खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, आणि तू त्यांच्याकडून खूप काही शिकत आहेस”. प्रसन्ना ‘सितारे’ हा शब्द त्या खास मुलांसाठी वापरत होते जे या चित्रपटात अभिनय करत आहेत.
हा चित्रपट २० जूनला प्रदर्शित होणार आहे. प्रसन्ना सरांनी दिग्दर्शन केलेला हा सिनेमा आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसनं बनवलेला आहे. या चित्रपटात आमिर खान आणि जेनेलिया डिसूझा दोघंही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘रेडी’ चित्रपटात जेनेलियाला न घेतल्याबद्दल आली अभिनेत्रीची प्रतिक्रिया, ऐकून सलमान खान होईल खुश
आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’मध्ये दिसणार मुलगा जुनैद खानच्या आगामी सिनेमाचा टिझर