मागील बराच दिवसांपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला ‘स्मार्ट जोडी’ हा शो मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर चांगलाच गाजताना दिसत आह. अगदी थोड्याच काळात या शोने चांगलीच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली आहे. मनोरंजनविश्वातील अनेक रियल लाईफ़ जोडणी या शोमध्ये सहभाग घेतला आहे. यातलीच एक गाजणारी जोडी म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री आणि हिमालय दासानी. या शोच्या सेटवर भाग्यश्रीने आतापर्यंत त्यांच्या प्रेमकहाणी आणि लग्नाशी संबंधित अनेक गोष्टी उघड केल्या. काही गोष्टी ज्या तिच्याबद्दल मीडियामध्ये सांगितल्या जातात त्यांना तिने चुकीच्या सांगत अफवा असल्याचे देखील सांगितले. आता पुन्हा एकदा या जोडीने त्यांच्या लग्नाशी संबंधित एक किस्सा सर्वांना सांगितला आहे.
स्मार्ट जोडी या शोच्या येणाऱ्या भागात भाग्यश्री त्यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा किस्सा सांगणार आहे. नुकताच या नवीन भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्या प्रोमोडमध्ये भाग्यश्री आणि हिमालय यांनी दमदार परफॉर्मन्स दिला. त्यानंतर हिमालय त्यांच्या ‘त्या’ रात्रीचा किस्सा सांगतो, हा किस्सा सांगताना भाग्यश्री लाजून लाल झालेली देखील प्रोमोमध्ये दिसत आहे. हा किस्सा सांगताना हिमालय म्हणतो की, “लग्नाचे सर्व विधी आणि रिसेप्शन झाल्यानंतर मी विचार करत होती की आता माझी नवरी छान घूंघट ओढून बसली असेल आणि मी येण्याची वाट बघत असेल. मात्र असे काही झाले नाही. जेव्हा मी आमच्या रूममध्ये पोहचलो तेव्हा भाग्यश्री तिच्या नाईट ड्रेसमध्ये होती. मला पाहून ती म्हणाली, ‘हॅलो बेबी’. हे पाहून मला धक्काच बसला.” हिमालयाचा हा किस्सा ऐकून तिथे असलेले सर्वच लोकं जोरजोरात हसत होते.
भाग्यश्री आणि हिमालय यांनी १९९० साली लग्न केले. त्यांचे लग्न भाग्यश्रीच्या घरच्यांना मान्य नव्हते. घरच्यांविरोधात जाऊन त्यांनी लग्न केले याचे तिला आजही दुःख आहे. स्मार्ट जोडीच्या सेटवर या दोघांचे पुन्हा लग्न देखील लावण्यात आले. या दोघांना अभिमन्यू दासानी आणि अवंतिका दासानी ही दोन मुलं आहेत.
हेही वाचा –