Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘माझ्या आज्जी-आजोबांनी खूप चांगले वळण लावले..’,म्हणत प्रतिक बब्बरने व्यक्त केला अभिमान

‘माझ्या आज्जी-आजोबांनी खूप चांगले वळण लावले..’,म्हणत प्रतिक बब्बरने व्यक्त केला अभिमान

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता प्रतिक बब्बर यानेअनेक गाजणाऱ्या चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याने खूप कमी वयात आपल्य करिअरची सुरुवात केली होती. अभिनेता सहसा कोणत्याच अवॉर्ड फंक्शन किंवा कार्यक्रमामध्ये जास्त दिसत नाही मात्र, तो इंडस्ट्रीमध्ये सतत आपल्या अभिनयासाठी ओळखला जोतो. प्रतिक   सध्या आपला आगामी येणारा चित्रपट ‘इंडिया लकडाउन’ मुळे चर्चेत खूप आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचा मुलगा म्हणजे अभिनेता प्रतिक बब्बर (Pratik Babbar) याने आपल्या दमदार अभिनयाने इंसट्रीमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्याचा आगामी येणारा चित्रपट ‘इंडिया लकडाउन’ (India lockdown) मध्ये तो मुख्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचा आगामी येणारा चित्रपट हा कोविड19 महामारी आणि देशात लॉकडाउनवर आधारित आहे. यामध्ये अभिनेता एका कामगाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांप्रती चांगली पसंती मिळत आहे. यामध्ये लॉकडाउनमुळे लोकांना किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला हे खूप चांगल्याप्रकारे चित्रित केले आहे.

चित्रपटादरम्यान प्रतिकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याने आपली आई अभिनेत्री स्मिता पाटील विषयी भावूक होऊन काही किस्से सांगितले. प्रतीकच्या मते जसे बाकीच्या लोकांना लॉकडाउनची झळ लागली आहे, त्याचप्रमानेच मला देखिल त्रास झाला आहे. तोही यांच्यापेक्षा वेगळा नाही. प्रतिक बब्बरचा जन्म झाल्यानंतर दोन आठवड्यानंतरच स्मिता पाटील यांचा मृत्यु झाला. चाइल्डबर्थ कॉम्पलिकेशंसमुळे त्यांना जिव गमवावा लागला. अगदी वयाच्या 31 वर्षीच त्यांनी जगाला राम राम ठोकला.प्रतीकने भावूक बोऊन सांगितले की, “मला लहाणपनापासूण दु:खाला खूप चांगल्याप्रकारे झगडता येत आहे, कारण लहाणपनापासूणच माल याचा अणुभव आहे. दु:खामुळे मी स्तब्ध नाही राहात. याच्याशी सामना करणं मला खूप चांगल्याप्रकारे जमतं. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांसोबत खूप चांगल्याप्रकारे व्यवहार करतो.”

 

View this post on Instagram

 

अभिनेत्याने पुढे सांगितले की, “मी माझ्या आज्जी आजोबांनी मला खूप चांगली शिकवण दिली आहे. मी त्यांचा ऋणी आहे. माझा लहाणपनापासूण त्यांनीच सांभाळ केला आहे. त्यांनी खपू प्रेमाने मला चांगले वळण लावले आहे.” स्मिता पाटील यांच्या मृत्युनंतर त्यांच्या आई वडीलांनीच प्रतीकचा सांभाळ केला आहे. इंडियन लॉकडाउन या चित्रपटाचे दिग्दर्शन मधुर भंडार (Madhur Bhandar) यांनी केले असून (दि,2 डिसेंबर 2022) रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (smita patil son india lockdown actor prateik babbar talks about his upbringing says i am a emotional person)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘कॅज्युअल सेक्स’ला योग्य मानतो प्रतीक बब्बर; म्हणाला, ‘मीही केलाय प्रयत्न’

आईच्या निधनानंतर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या प्रतीक बब्बरने काढून टाकले होते वडिलांचे आडनाव

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा