Monday, February 26, 2024

आज मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांनी केले होते वेट्रेस म्हणून काम, मात्र ‘क्योंकी’ने बदलवले नशीब

मनोरंजनविश्व आणि राजकारण यांचा खूपच जवळचा संबंध आहे. अनेक राजकारणी चित्रपटांमध्ये भूमिका साकारताना दिसतात तर अनेक कलाकार राजकारणामध्ये प्रवेश करत आपल्या नव्या इंनिगला सुरुवात करतात. अशी आज अनेक उदाहरण आहेत, ज्यांनी मनोरंजनविश्वरून राजकारणात प्रवेश केला आणि यशही मिळवले. असे देखील काही कलाकार आहेत जे आता चित्रपटांपासून लांब राजकारणातच रमले आहेत.

अशाच एक अभिनेत्री आणि आताच्या केंद्र मंत्री स्मृती इराणी सर्वांनाच माहित आहे. आपल्या दमदार भाषणांनी आणि निर्णयांनी त्यांनी एक कुशल आणि हुशार राजनेता अशी ओळख संपूर्ण जगात कमावली आहे. मात्र राजकारणात येण्याआधी त्यांनी एक ताकदीची अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण केली होती. आजच्या पिढीला जरी स्मृती इराणी हे नाव एक मंत्री म्हणून माहिती असले तरी त्या एक उत्तम, लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. आज गुरुवारी (23 मार्च)ला स्मृती इराणी त्यांचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती आणि त्याचा अभिनेत्री ते राजनेता असा प्रवास.

आज मोदी सरकारमधील अत्यंत कुशल आणि धडाडीच्या नेता म्हणून स्मृती यांची ओळख आहे. मात्र एक काळ असा होता जेव्हा स्मृती यांची घरातील आदर्श सून अशी इमेज लोकांमध्ये तयार झाली होती. पुढे स्मृती यांच्या नशिबाने कलाटणी घेत त्यांना राजकारणात नेले आणि तिथे त्यांनी त्यांची एक वेगळी आणि प्रभावी छाप पाडली. स्मृती यांचा जन्म 23 मार्च 1976 साली दिल्लीमध्ये झाला. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण होली चाइल्ड ऑक्जिलियम स्कुलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी स्कूल ऑफ लर्निंग (पत्राचार), दिल्ली विश्वविद्यालयमध्ये प्रवेश घेतला. पैसे कमवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेट्रेसचे काम देखील केले.

याचदरम्यान त्यांना कोणीतरी मॉडलिंगमध्ये प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आणि त्या मुंबईत आल्या. 1998 साली त्यांनी मिस इंडिया पेजेंट स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याच वर्षी त्यांनी मिका सिंगच्या ‘सावन मै लग गयी आग’ या म्युझिक अल्बममधील ‘बोलियां’ गाण्यात परफॉर्मन्स दिला. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात ‘आतिश’ पासून केली. पुढे त्या ‘हम हैं कल आज और कल’, ‘कविता’ आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकांमध्ये झळकल्या. त्यांना ‘क्योंकी…’ मालिकेने तुफान प्रसिद्धी आणि नवीन ओळख मिळवून दिली. सुरुवातीला एकता कपूरने ‘क्योंकी’ साठी त्यांना रिजेक्ट केले होते. ‘क्योंकी’ मालिकेमुळे त्या अमाप लोकप्रिय झाल्या आणि ‘तुलसी विराणी’ ही नवीन ओळख त्यांना मिळाली.

पुढे स्मृती यांनी ‘विरुद्ध’ ‘तीन बहुरानियां’ आणि ‘एक थी नायिका’ आदी मालिकांमध्ये काम केले. 2003 साली त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. 2004 साली त्यांना महाराष्ट्राच्या यूथ विंगचे व्हॉइस प्रेसिडेंट बनवले गेले. 2010 साली स्मृती बीजेपीच्या राष्ट्रीय सचिव आणि महिला विंगच्या अध्यक्ष बनल्या. 2014 साली त्या अमेठीमधून राहुल गांधी यांच्याविरोधात लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या मात्र त्या निवडणूक हरल्या. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्मृती यांनी राहुल गांधी यांना 38000 मतांनी हरवत विजय मिळवला. त्यांनी मोदी सरकारमध्ये मानव संसाधन आणि विकास मंत्री म्हणून काम केले. सध्या त्या कापड आणि महिला, बाळ विकास मंत्री म्हणून काम करत आहेत.

स्मृती यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी पारशी व्यावसायिक असलेल्या जुबिन इराणी यांच्याशी लग्न केले. 2001 साली त्यांना जोहर नावाचा एक मुलगा झाला, तर 2003 साली त्यांनी जोइश नावाच्या मुलीलाही जन्म दिला.(smriti irani birthday know her journey from modelling to politics)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गुढीपाडव्यानिमित्त प्रियाने नऊवारीमध्ये शेअर केले सुंदर फाेटाेशूट, एकदा पाहाच
रियल बधाई हो! ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री २३ व्या वर्षी झाली ताई, आईने दिला वयाच्या ४७ व्या वर्षी बाळाला जन्म

हे देखील वाचा