‘क्योंकी सास भी कभी बहू थी‘ फेम आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या घरी लवकरच लग्नाची वरात येणार आहे. स्मृती यांची लेक शानेल इराणी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शनेल अर्जुन भल्लासोबत लग्न करणार आहे. अलीकडेच शनेल आणि अर्जुनचा साखरपुडा झाला. अशात स्मृतीची लेक शनेल हिच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. अशा परिस्थितीत स्मृती इराणींचा हाेणारा जावई अर्जुन भल्ला कोण आहे आणि तो काय करतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
स्मृती इराणी (smriti irani) यांचा हाेणारा जावई अर्जुन भल्ला (arjun bhalla) याचा जन्म टोरंटो, कॅनडा येथे झाला. अर्जुन त्याच्या संपूर्ण कुटुंबासह तेथे राहतो. कॅनडातील सेंट रॉबर्ट कॅथोलिक हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. 2009 ते 2013 पर्यंत त्यांनी बी.एस्सी.मध्ये पदवी प्राप्ती केली, तर कॅनडातील टोरंटो येथील सेंट मायकल कॉलेजमधून 2013 ते 2015 मध्ये त्यांनी मानसशास्त्र, नीतिशास्त्र आणि एलएलबी केले. याचबरोबर अर्जुनने 2014 साली कॅनडामध्ये अकाउंट मॅनेजर म्हणूनही काम केले आहे आणि काही कंपन्यांमध्ये लीगल इंटर्न म्हणूनही काम केले आहे.
View this post on Instagram
शानेल इराणी पेशाने आहे वकील
शानेल ही स्मृती इराणी यांच्या पतीची पहिली पत्नी मोना इराणी यांची मुलगी आहे. शानेल पेशाने वकील आहे. तिचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले आहे. त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. शानेलने जॉर्जटाउन विद्यापीठातून लॉचे शिक्षण घेतले. स्मृती इराणी यांना झुबिनपासून दोन मुले आहेत, त्यांची नावे जोहर आणि जोश असे आहेत.(bollywood who is union minister smriti irani future son in law arjun bhalla will be married to her daughter shanelle irani )
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बींना बेल बाॅटम घालने पडले महागात, एक उंदीर त्यांच्या पॅटंमध्ये घुसला अन्…
रोमन वास्तुकलेवरून प्रेरित कियाराच्या लग्नाच्या लेहेंग्याने वेधले लक्ष, सिद्धार्थचा लूक देखील ठरला आकर्षक