Saturday, June 29, 2024

… म्हणुन श्रीदेवीला झाडामागे बदलावे लागायचे कपडे; अभिनेत्रीने स्वत: केला होता खुलासा

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पूर्वीच्या काळात, शूटिंग दरम्यान पुरेशी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे अभिनेत्रींना खूप त्रास सहन करावा लागला. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले की, सेटवर कपडे बदलताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते.

तुम्हालाही माहितच असेल ७०-९०च्या दशकात चित्रपटाची शूटिंग करणे किती कठीण असायचे. अनेकदा कलाकारांना शूटींग करण्यासाठी बाहेर इतर ठिकाणी जावे लागते. शूटिंग पुर्ण होईपर्यंत शुटिंग पाॅईंटच्या ठिकाणीच राहावे लागते. त्यावेळी अनेक समस्यांना सामोरे जाऊन कलाकारांना शूट करावे लागायचे. पहिल्या काळातही शुटींग करताना अभिनेत्रींना प्रत्येक सीननुसार कपडे बदलावे लागायचे. त्यावेळी त्यांना पुरेश्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तर कपडे बदलण्यासाठी प्रायव्हेट रुम नसतानाही त्यांना कपडे बदलावे लागत असल्याची माहिती श्रीदेवींनी सांगितली होती.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी एकदा या समस्यांविषयी अगदी मन मोकळेपणाने बोलल्या. ज्यात त्याने सांगितले की, शूटिंग दरम्यान अभिनेत्रींना कसे आणि काय काय त्रास होत होते.

पहिल्या काळात अभिनेत्री झाडामागे बदलायच्या कपडे
एका मुलाखतीत श्रीदेवींनी सांगितले होते की, आजच्यापेक्षा जुण्याकाळी स्त्रियांना चित्रपटांमध्ये काम करणे खूप कठीण होते. श्रीदेवी म्हणाल्या होत्या की, आजच्या अभिनेत्रींना व्हॅनिटी व्हॅन सारख्या सुविधा मिळतात, हे त्याचं खुप मोठ भाग्य आहे‌. त्यांच्या काळात अभिनेत्रींना झाडाच्या मागे जाऊन कपडे बदलावे लागायचे. त्यावेळी व्हॅनिटी व्हॅन असे काहीच उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत स्त्रिया अभिनेत्रीला चारही बाजूंनी कपड्यांनी झाकत असत. त्या पडद्याच्या मागे अभिनेत्री कपडे बदलत असत.

अभिनेत्रींना सेटवर ‘या’ अडचणी येत असत
केवळ श्रीदेवीच नाही, तर यापूर्वी जुन्या अभिनेत्रींनीही याचा उल्लेख केला आहे. त्यावेळी शूटिंग सेटवर ना एसी होता आणि ना अभिनेत्रींकडे व्हॅनिटी व्हॅन होती. त्या दिवसभर घाम गाळत बसायच्या. ज्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा मेकअप करावा लागायचा. तसेच, कधीकधी त्यांना बर्फ आणि मुसळधार पावसातही शूटिंग करावी लागत होती.

दरम्यान, श्रीदेवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षे काम केले आहे. अनेक अनोखी भुमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्व:ताचे स्थान निर्माण केले. असे म्हटले जाते की, ‘चालबाज’ चित्रपटादरम्यान अभिनेत्रीला १०३ डिग्री ताप आला होता. तरीही, त्यांनी ‘ना जाने कहां से आया है’ या गाण्यासाठी शूट केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! चक्क बर्फाच्या पाण्यात केला त्यांनी रोमँटिक डान्स; बघतच राहिले प्रेक्षक

-बक्कळ रक्कमेच्या मोहात न पडता ‘या’ कलाकारांनी ‘बिग बॉस’साठी दिला स्पष्ट नकार; सलमानच्या अभिनेत्रीचाही आहे समावेश

-सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! अभिनेता बनला ऑलिम्पिक मूवमेंटचा ब्रँड ऍंम्बेसेडर; रशियात करणार टीम इंडियाचे नेतृत्व

हे देखील वाचा