Monday, July 1, 2024

‘याची गरुड पुराणात वेगळी शिक्षा आहे’, रानू मंडलचा बाईकवरील रोमँटिक व्हिडिओ पाहून संतापला नेटकरी

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसाठी ‘रानू मंडल‘ हे नाव कदाचित नवे नसेल. कारण, व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे एका रात्रीत स्टार बनलेल्या रानू मंडलला जबरदस्त प्रसिद्ध मिळाली होती. व्हायरल व्हिडिओत ती लता मंगेशकर यांचे गाणे गाताना दिसली होती. यामुळे ती थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचली होती. मात्र, ही जादू फार काळ चालली नाही. एका गाण्याने तिचे आयुष्य बदलले, पण ते फक्त काही काळासाठीच. मात्र, ती आजही तितकीच चर्चेत असते. नेटकरी तिला ओळखतात, त्यामुळेच तिचा कोणताही नवीन व्हिडिओ येताच व्हायरल होतो. अशातच आता रानू मंडलचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत रानू मंडल (Ranu Mondal) साडी किंवा सूट नाही, तर जबरदस्त मॉडर्न लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओत तिने निळ्या रंगाची फ्रॉक परिधान केल्याचे दिसत आहे. तसेच, ती एका मुलासोबत दुचाकीवर बसून रोमान्स करतानाही दिसत आहे. बाईकवर रानू मंडलला एका मुलासोबत रोमान्स करताना पाहून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohan Shaw (@rohanyt779)

युजर्सकडून कमेंट्सचा वर्षाव
या व्हिडिओवर युजर्सनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिले की, “देवाला थोडं तरी घाबरा. गरुड पुराणात याची वेगळी शिक्षा आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “शेवटी रानू मंडलला बॉयफ्रेंड भेटलाच.” आणखी एका युजरने लिहिले की, “या म्हाताऱ्या महिलेची मानसिक स्थिती ठीक नाहीये. तिला माहिती नाहीये की, ती काय करत आहे. तिचे कुटुंबीय योग्यरीत्या तिची काळजी घेत नाहीयेत. लोक तिचा फायदा उचलत आहेत.”

रानू मंडलविषयी थोडक्यात
रानू मंडल ही पश्चिम बंगालची राहणारी आहे. 2019मध्ये एका व्यक्तीने रेल्वे स्टेशनवर रानू मंडलचा लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गातानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. यानंतर ती एका रात्रीत प्रसिद्ध झाली होती. तिचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता की, तिला थेट गायनाच्या रियॅलिटी शोमध्ये बोलावण्यात आले होते. यानंतर हिमेश रेशमिया याने तिच्यासोबत एक गाणेही रेकॉर्ड केले होते. मात्र, तिला ही प्रसिद्धी फार काळ टिकवता आली नाही. सध्या तिचे रील व्हिडिओ व्हायरल होत असतात. (social media sensation ranu mondal raomantic video with a boy sitting in bike see here)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आख्खं 2022 वर्ष संपलं, पण ‘या’ 5 दमदार भूमिका गेल्या भाव खाऊन; एका क्लिकवर घ्या जाणून
विषये का! 2022मधील सर्वात श्रीमंत अभिनेते, फ्लॉप सिनेमे देऊनही कमावला बक्कळ, ‘हा’ पठ्ठ्या अव्वलस्थानी

हे देखील वाचा