गर्वाचे घर खाली! पुन्हा एकदा रस्त्यावर गाणे गाताना दिसली रानू मंडल

रस्त्यावर उठून इंडस्ट्रीमध्ये कलाकार होणे कोणासाठीही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकालाच इथे प्रसिद्धी मिळते असे नाही. सर्वांनाच तो यशाचा टप्पा गाठण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो, पण ते म्हणतात ना, ‘दैव देते आणि कर्म नेते’ अशातला हा प्रकार. अशीच एक व्यक्ती आहे, जी आज एक स्टार झाली असती. परंतु तिला ते टिकवून ठेवता आले नाही. होय, आपण बोलत आहोत रानू मंडलबद्दल. तिच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अशातच आता तिचा आणखी एक व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे.

रानू मंडलचा नवीन व्हिडिओ समोर आला
सुरुवातीला व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे रानू मंडल भलतीच प्रसिद्ध झाली होती. इतकेच नव्हे, तर तिला चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. मात्र, तिला हे यश जास्त दिवस टिकवून ठेवता आले नाही. आता रानू पुन्हा रस्त्यावर आली आहे. अलीकडेच, रानू मंडलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती कारच्या बाहेर माईक धरून लताजींचे गाणे गाताना दिसत आहे. मात्र, तिचे कपडे पुन्हा जुने दिसत आहेत. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही युजर्सकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे.

https://www.facebook.com/100054612731806/videos/2934361503559600/

या व्हिडिओमध्ये रानू मंडल एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात माईक धरून गाणे गाताना दिसत आहे. यावर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले की, “गायक ठीक आहे, पण ती गर्वामुळे बुडली.” एकाने लिहिले की, “प्रसिद्धी मिळताच हिला अभिमान आला.” आणखी एका युजरने लिहिले की, “आता कोणालाही हे पाहणे किंवा ऐकणे आवडत नाही.” त्याचवेळी एका युजरने असेही लिहिले की, “माणसांकडून चुका होतात आणि त्यांना आणखी एक संधी दिली पाहिजे.”

पश्चिम बंगालमधील राणा घाटाच्या रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीने रानू मंडलचा व्हिडिओ बनवला होता. ज्यात ती लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गात होती. व्हिडिओ रातोरात व्हायरल झाला आणि रानू मंडल स्टार बनली. तिच्या गाण्याची सर्वत्र चर्चा होत होती. यानंतर गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियानेही रानू मंडलला त्याच्या ‘हॅपी हार्डी एँड हीर’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. यानंतर, एका चाहत्याने तिला सेल्फी मागितली होती, तेव्हा नकार दिल्यामुळे ती ट्रोलिंगची शिकार झाली होती.

त्यावेळी रानू मंडलचा मेकओव्हरही झाला होता. यामुळे ती ट्रोल झाली होती. तिला अनेक रियॅलिटी शोमध्ये विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. परंतु हे सर्व काही तिला फार काळ टिकवता आले नाही. हळूहळू तिच्याबद्दलचा आदर पुन्हा लोकांच्या मनातून कमी होत गेला. लोक म्हणतात की, रानू मंडल जिथून सुरुवात केली त्या ठिकाणी पोहोचली आहे. मात्र, तिचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रसिद्ध दिग्दर्शकाने बॉलिवूडचं काळं सत्य आणलं बाहेर; म्हणाले, ‘इथं एवढं जोरात मारलं जातं की…’

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

Latest Post