सोहा अली खानने (Soha Ali Khan) नुकत्याच दिलेल्या IANS च्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, ती उपाशी पोटी काय खातात. अभिनेत्री सोहा अली खान लोकांना नेहमीच हेल्दी राहायला सांगत असते. गुरुवारी तिनं सोशल मीडियावर सांगितलं की ती रोज सकाळी उपाशीपोटी काय खात असते.
अभिनेत्रीने एक पोस्ट टाकून चाहत्यांना विचारलं,”मी रोज सकाळी उपाशीपोटी काय खाते?” तिनं दोन ऑप्शनही दिले भिजवलेले बदाम आणि लसूण.सोहानं इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये एक व्हिडीओ टाकला होता ज्यामध्ये ती कच्चा लसूण खाताना दिसतेय. पोस्टवर तिनं मजेशीरपणे विचारलं होतं,”ओळखा बघू, मी रोज सकाळी उपाशीपोटी काय खाते? भिजवलेले बदाम की लसूण?” काही दिवसांपूर्वी तिनं अजून एक गोष्ट सांगितली होती,ती गेल्या तीन महिन्यांपासून रोज सकाळी उपाशीपोटी पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस पिते!
सोहा अली खाननं पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस बनवत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामधून तिनं तिच्या सकाळच्या दिनचर्येची झलक दाखवली. या व्हिडीओसोबत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं,”सेल्फ लव्ह खूपच गरजेची आहे. मी गेले तीन महिने रोज सकाळी उपाशीपोटी पांढऱ्या भोपळ्याचा ज्यूस पीतेय. हा ज्यूस पोटासाठी खूप फायदेशीर आहे”. याशिवाय, सोहानं किचनमध्ये घालवलेल्या काही क्षणांचे फोटोसुद्धा इंस्टाग्रामवर टाकले होते. या फोटोंमध्ये ती स्वयंपाक करताना दिसतेय, पण ती नेमकं काय बनवत होती, हे तिनं सांगितलेलं नाही.
‘छोरी 2’च्या प्रमोशन दरम्यान सोहा अली खाननं एका मुलाखतीत मजेशीर खुलासा केला ती म्हणाली, “माझं स्वयंपाकात काहीच लक्ष नाही! आमच्या घरात किचनची जबाबदारी कुणाल (खेमू) सांभाळतो”. तिनं हसत हसत असंही सांगितलं की, “सोशल मीडियावर मी जे फोटो टाकते, त्यात मी फक्त स्वयंपाक करत असल्याचं नाटक करते!”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










