×

लग्नाच्या तब्बल २४ वर्षांनंतर घटस्फोट घेतायेत सीमा अन् सोहेल खान, पण ५ वर्षांपासून…

बॉलिवूडमध्ये नाते बनणे किंवा तुटणे काही नवीन नाही. सिनेसृष्टीत या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. गेल्या काही काळात अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता बातमी येत आहे की, अभिनेता सोहेल खान (Sohail Khan) आणि त्याची पत्नी सीमा खान (Seema Khan) यांचा घटस्फोट होणार आहे. लग्नाच्या तब्बल २४ वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. खरं तर, सोहेल खान आणि सीमा खान शुक्रवारी (१३ मे) कौटुंबिक न्यायालयाबाहेर दिसले. त्यांचे कौटुंबिक न्यायालयाबाहेरचे काही फोटोही व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sohail Khan (@sohailkhanofficial)

समोर आलेल्या वृत्तानुसार, कौटुंबिक न्यायालयातील एका सूत्राने सांगितले की, सोहेल खान आणि सीमा खान आज न्यायालयात हजर होते. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर दोघेही आपापल्या कारमधून घराकडे निघाले. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिथे सोहेल खान आणि सीमा खान दिसत आहेत. (sohail khan and seema khan file for divorce after 24 years of marriage)

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सोहेल खान आणि सीमा खान १९९८ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. २०१७ मध्ये आलेल्या रिपोर्ट्सनुसार, सोहेल आणि सीमा वेगळे झाल्याची माहिती समोर आली होती. ‘द फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलीवूड वाइव्ह्ज’ या शोमध्ये सोहेल आणि सीमा वेगळे राहतात आणि मुलं दोघांसोबत राहतात असं दाखवण्यात आलं होतं. या शोमधून स्पष्ट झालं होतं की, सीमा आणि सोहेल वेगवेगळे राहतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post