‘दिल मिल गये’च्या सेटवर ‘तीने’ टेलिव्हिजनचा सुपरस्टार असलेल्या करण सिंग ग्रोव्हरच्या मारली होती कानाखाली


छोट्या पडद्यावरील काही अशा मालिका आहेत, ज्या प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. त्यासोबतच काही असे चेहरे सुद्धा आहेत, जे चाहत्यांच्या पसंतीस उरत असतात आणि काहींना तर बॉलिवूडमध्ये देखील काम करण्याची संधी मिळते. त्यातीलच एक म्हणजे करण सिंग ग्रोव्हर. हँडसम हंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कलाकाराचे व्यक्तिगत आयुष्य फारच चर्चेत राहिले आहे.

२३ फेब्रुवारी १९८२ साली जन्माला आलेल्या करणने आपले शालेय शिक्षण सौदी अरेबियाच्या दम्माममधून पूर्ण केले. त्यानंतर भारतात आल्यावर मुंबईच्या आयएचएम मधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली. ओमान मधील शेरेटन हॉटेल मध्ये विपणन कार्यकारी म्हणून देखील त्याने काम केले होते. काही काळाने तो मॉडेलिंग क्षेत्रात उतरला, ज्यात त्याने ग्लॅडरग्स मॅनहंट स्पर्धेत सहभाग नोंदवला, जिथे त्याला लोकप्रिय मॉडेल म्हणून सन्मानित केले.

सन २००४ च्या एमटीव्ही इंडिया वरील बालाजी टेलिफिल्म्स प्रदर्शित ‘ मस्त है जिंगदी’ या कार्यक्रमातून त्याने अभिनय कारकिर्दीत पदार्पण केले. त्यानंतर २००६ ची ‘कसोटी जिंदगी की’ मालिका त्याची प्रचंड गाजली. परंतु त्याला खरी ओळख मिळवून दिली ती ‘दिल मिल गये’ या लोकप्रिय मालिकेने.

खरं तर या मालिकेचा सेटवरच जेनिफर आणि करणची भेट झाली होती. दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की दोघांनाही सतत एकमेकांच्या नावाने चिडवले जायचे. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांनी लग्न करायचा निर्णय घेतला. मात्र लग्नानंतर करणचा खरा चेहरा तिच्या समोर समोर आला आणि दोघांमध्ये खटके आणि भांडणं व्हायला सुरुवात झाल्यामुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

करणने जेनिफर अगोदर श्रद्धा निगमसह २०१६ मध्ये पहिले लग्न केले होते, मात्र तेही जास्त दिवस टिकले नाही. श्रद्धा हिने कित्येकदा त्याला इतर मुलींना फसवताना पकडले होते. २००९ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.

पहिले लग्न संपुष्टात आल्यानंतर जेनिफरसोबत त्याने दुसरे लग्न केले. काही काळाने जेनिफरला करणबद्दल काही गोष्टी समजल्या, ज्यामुळे जेनिफरने दिल मिल गयेच्या सेट वर करणच्या कानशिलात लगावली होती. कारण त्यावेळी ते दोघे एकमेकांना डेट करत होते आणि तो दुसरीकडे दुसऱ्या मुलीला फसवत होता.

‘अलोन’ या सिनेमासाठी करण आणि बिपाशा एकत्र शूटिंग करत होते, त्याचवेळी करण आणि बिपाशाची जवळीक वाढू लागली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरवात केली. सन २०१६ मध्ये त्यांनी लग्न केले.

अनेक वर्षांनंतर करणने पुन्हा एकदा स्टार प्लस वाहिनीवरील ‘ कसोटी जिंदगी की’ या मालिकेतुन छोट्या पडद्यावर पुनरागमन केले होते. परंतु काही कारणास्तव त्याने ती मालिका सोडली. त्याजागी करण पटेलला ती भूमीका करायची संधी दिली गेली. विशेष म्हणजे कसोटी जिंदगी कीच्या पहिल्या पर्वात तो प्रेरणाच्या जावयाच्या भूमिकेत दिसला होता. काही काळ तो डिप्रेशनमध्ये असल्याचे बोलले जात होते.

करण परिवार, झलक दिखला जा, खतरो के खिलाडी, दिल दोस्ती डान्स, कबुल है, जरा नचके दिखा या मालिकेत दिसला होता तर ‘अलोन’ आणि ‘हेट स्टोरी ३’या चित्रपटात देखील त्याने काम केले आहे. सन २०२१ मधील ‘बॉस’ आणि २०२० मधील ‘डेंजरस’ ही त्याची वेब सिरीज प्रचंड गाजली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.