Wednesday, June 26, 2024

रामायणासंबंधित प्रश्नावर सोनाक्षीने केबीसीमध्ये लाईफलाईन वापरल्यानंतर दबंग गर्लने केला होता तुफान ट्रोलिंगचा सामना

बॉलिवूडमध्ये नेहमीच अभिनेते आणि त्यांचे चित्रपटातील संवाद तुफान गाजतात. कलाकरांना त्यांचे संवाद एक वेगळीच ओळख मिळवून देतात. मात्र असे खूपच कमी वेळा घडते की, अभिनेत्रींचे संवाद गाजतात आणि त्या त्यांच्या संवादामुळे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होतात. कदाचित सोनाक्षी सिन्हा ही बॉलिवूडमधील पहिलीच अभिनेत्री असावी जी तिच्या पहिल्याच सिनेमातील दमदार संवादामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली. सलमान खानसोबत ‘दबंग’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सोनाक्षीने तिचे अभिनयाने अमाप लोकप्रियता मिळवली. आज २ जून सोनाक्षी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. पहिल्याच सिनेमातून तिने तिच्या अभिनयाने दबंग गर्ल ही ओळख मिळवली. आज सोनाक्षी बॉलिवूडमध्ये तुफान लोकप्रिय आहे. तिने तिच्या करिअरममध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या सिनेमांमध्ये काम केले. मात्र सोनाक्षी जेवढी तिच्या कामामुळे प्रकाशझोतात आली तेवढीच ती तिच्या वादांमुळे आणि ट्रोलिंगमुळे देखील गाजली. आज आपण तिच्याशी संबंधित असच एक ट्रोलिंगचा किस्सा जाणून घेणार आहोत.

आपल्याच पहिल्याच सिनेमात सोनाक्षीला तिच्या वजनावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर तिने ग्रूमिंग करत स्वतःचे वजन कमालीचे कमी केले आणि एका नव्या अवतारात सर्वांसमोर आली. आपल्या करिअरमध्ये अनेक उतार चढाव बघणारी सोनाक्षी केबीसीमध्ये आली आणि मोठ्या ट्रोलिंगला सामोरी गेली.

सर्वानाच माहिती आहे की, सोनाक्षीच्या घरात रामायणाचा मोठा पगडा आहे. तिच्या घराचे नाव रामायण असून, तिच्या वडिलांसोबत इतर भावांचे नाव देखील राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे आहे. शिवाय सोनाक्षीच्या भावांची नावे लव आणि कुश आहेत. अशातच सोनाक्षी २०१९ साली अमिताभ बच्चन यांच्या केबीसीच्या मंचावर स्पर्धक बनून पोहचली होती. यावेळी तिला अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारला की, रामायणामध्ये हनुमान कोणासाठी संजीवनी बुटी घेऊन आले होते? अतिशय साधा आणि सोपा प्रश्न असूनही सोनाक्षीला या प्रश्नाचे उत्तर माहित नव्हते आणि तिने यासाठी लाइफलाइन वापरली. तिचे हे कृत्य पाहून अमिताभ बच्चन देखील आश्चर्यचकित झाले होते.

यानंतर सोनाक्षीची सोशल मीडियावर तुफान टिंगल उडवली गेली. ट्विटरवर तर #YoSonakshiSoDumb नावाने हॅशटॅग बनवून तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले. यावर अनेक मीम्स देखील आले. या तुफान होणाऱ्या ट्रोलिंगवर सोनाक्षीने सांगितले होते की, “मला पाइथागोरस थेरी, मर्चेंट ऑफ वेनिस, पीरियोडिक टेबल, मुगल वंश आदींबद्दल देखील माहिती नाही जर तुमच्याकडे काम नसेल तर यावर देखील मीम्स बनवा कारण मला मीम्स आवडतात.”

सोनाक्षीने आतापर्यंत रावडी राठोड, नूर, अकिरा, सन ऑफ सरदार, लुटेरा, हॉलिडे, आर राजकुमार, लिंगा, खानदानी शफ़ाकखाना, हॅप्पी फार भाग जायेगी, भुज, मिशन मंगल आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
ऋता दुर्गुळेने केला सासूबाईंबद्दल धक्कादाक खुलासा; म्हणाली, “त्या खूप…”
संघर्षातून पुढे आलेल्या ‘इमली’फेम अभिनेत्रीचा ‘असा’ आहे जीवनप्रवास; एकदा वाचाच

हे देखील वाचा