Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड काय सांगता! सोनाक्षी सिन्हा बनणार सलमान खानच्या कुटुंबाची सून, ‘या’ व्यक्तीसोबत करणार लग्न?

काय सांगता! सोनाक्षी सिन्हा बनणार सलमान खानच्या कुटुंबाची सून, ‘या’ व्यक्तीसोबत करणार लग्न?

सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार लग्न बंधनात अडकत आहेत. नुकतेच राजकुमार राव-पत्रलेखा आणि अनुष्का रंजन आणि आदित्य सील यांचे लग्न झाले आहे. तसेच विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या लग्नाची तयारी चालू आहे. त्यांचे लग्न पुढील महिन्यात होणार आहे. यासोबतच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट याच्या लग्नाच्या बातम्या देखील ऐकू येत आहे. या लग्नाच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे. ती म्हणजे दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा.

माध्यमातील वृत्तानुसार, सोनाक्षी सिन्हा ही सलमान खानच्या परिवारातील एका सदस्याशी अगदी जवळ आहे, तसेच त्याच्यासोबत रिलेशनमध्ये आहे. सलमान खानच्या परिवारातील या सदस्याचे नाव बंटी असे आहे. सोनाक्षी आणि बंटी यांच्या लग्नाची तयारी चालू झाली आहे. बंटी हा सलमानचा छोटा भाऊ सोहेल खानचा मेव्हणा आहे. सोनाक्षी आणि बंटी यांची खूप चांगली मैत्री आहे, अनेकवेळा ते एकत्र स्पॉट होतात. (sonakshi sinha wedding with a person who is member of salman khan’s family)

माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने सांगितले होते की, जेव्हा ती शाळेत होती तेव्हा तिला खरे प्रेम झाले होते. परंतु ग्रॅजुएशन पूर्ण होताच तिचे ब्रेकअप झाले. तिने सांगितले की, हे रिलेशन तिने खूप सिरिअसली घेतले होते. ती पूर्ण पाच वर्ष रिलेशनमध्ये होती. परंतु सोनाक्षीने त्या मुलाच्या नावाचा खुलासा केला नाही. तरी देखील आता सगळेजण असा अंदाज लावत आहेत की, तो मुलगा इतर कोणी नाहीतर बंटी सचदेवा हा आहे.

सोनाक्षी आणि बंटीची खूप चांगली बॉंडिंग आहे. अनेक पार्टीमध्ये ते दोघे एकत्र स्पॉट होतात. एका मुलाखतीत सोनाक्षीने बंटीचे खूप कौतुक केले होते. तिचे असे म्हणणे आहे की, बंटी त्याची प्रत्येक गोष्ट एन्जॉय करत असतो. सोनाक्षी सलमान आणि त्याच्या कुटुंबाशी खूप जवळ आहे. सलमान खानचे वडील सलीम खान आणि शत्रुघन सिन्हा खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे आता बंटी आणि सोनाक्षी लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या येत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा