मराठी सिनेसृष्टीमधील सतत चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. सोनालीने सुंदरतेसोबतच आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगळच स्थान निर्माण केलं आहे. ‘अप्सरा आली’ या गाण्यानंतर तिला ‘महाराष्ट्राची अप्सरा’ या नावानेही अल्लेखलं जातं. गेल्यावर्षीच सोनालीने कुणाल बेनोडेकर सोबत लग्न गाठ बांधली. आता सोनाली लवकरच गुड न्युज देणार असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्राची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान गुड न्युज बद्दल सांगितलं आहे. लॉकडाऊनमध्ये रजिस्टर मॅरेज केल्यानंतर सोनालीने मागच्या वर्षी कुणाल बेनोडेकर सोबत अमेरिकामध्ये पारंपारिक पद्धतीने थाटामाटात लग्नसोहळा उरकला होता. याचे फोटोदेखिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. सध्या सर्वत्र तिच्या गुड न्युजच्या चर्चा रंगल्या आहेत. पण ही गुड न्युज नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
‘पटलं तर घ्या‘ या ओटीटी प्लॅटफॉर्मवलरील प्रदर्शित कार्यक्रमामध्ये नुकतंच सोनालीने हजेरी लावली होती, ज्यामध्ये सोनाली कोणालातरी फोन करुन सांगते की ‘आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे’ त्यामुळे अता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की, नमेकं काय गुड न्युज आहे? त्यामुळे प्रेक्षकही गुड न्युज ऐकण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
या कार्यक्रमामध्ये सोनालीने तिच्या सोबत घडलेले अनेक धमाकेदार किस्से सांगितले आहेत. त्यामध्येच तिने एक धमाला किस्सा सांगितला आहे. तिच्या आवाजावरून तिला अनेकदा नाकारण्यात आले, हेसुद्धा तिने यावेळी सांगितले. तसेच सोनाली काय गुडन्यूज देणार हे पटलं तर घ्याच्या शुक्रवारच्या भागात समोर येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
पहिला सिनेमा मिळवण्यासाठी कार्तिक आर्यनने पाहिली तीन वर्ष वाट, मोठ्या संघर्षाने मिळवले यश
‘कुछ कुछ होता है’ फेम सरदारजीने तब्बल 25 वर्षांनंतर घेतली शाहरुखची भेट; म्हणाला, ‘जेव्हा पठाण…’