Monday, October 7, 2024
Home मराठी पारंपारिक ड्रेसला मॉर्डन लूक देऊन सोनाली कुलकर्णीने शेअर केला तिचा मनमोहक व्हिडिओ

पारंपारिक ड्रेसला मॉर्डन लूक देऊन सोनाली कुलकर्णीने शेअर केला तिचा मनमोहक व्हिडिओ

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. आपल्या सौंदर्याने आणि नजरेच्या एका इशाऱ्याने चाहत्यांना घायाळ करणारी सोनाली सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती ती सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना देत असते. तसेच तिच्या फॅशन सेन्समुळे देखील ती खूप चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाइल सगळ्यांना खूप आवडते. तिचे चाहते देखील तिच्या नवनवीन ड्रेसिंग स्टाइलला प्रोत्साहन देत असतात. अशातच सोनालीचा एक आगळा वेगळा लूक समोर आला आहे.

सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा लूक पाहण्याजोगा आहे. तिने महाराष्ट्रीयन परंपरेप्रमाणे चोळी आणि परकर घातलेला आहे. परंतु तिचा हा ड्रेस तिने अगदी मॉर्डन पद्धतीने डिझाईन केलेला आहे. तिने जांभळ्या रंगाची चोळी आणि गुलाबी रंगाचा परकर परिधान केलेला आहे. परंतु या ट्रेडिशनल ड्रेसला तिने वेस्टर्न टच दिला आहे. या ड्रेसमध्ये सोनली गजब सुंदर दिसत आहे. यामध्ये ती झोपाळ्यावर बसून पोझ देताना दिसत आहे. (Sonalee kulkarni share her video on social media)

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांसोबत अनेक अभिनेत्रींना देखील भावला आहे. तिच्या या पोस्टवर अनेक अभिनेत्रींनी कमेंट करून तिच्या या नवीन ड्रेसचे आणि तिचे कौतुक केले आहे. तिच्या या पोस्टवर डान्सर फुलवा, ऋतुजा बागवे तसेच प्रार्थना बेहेरे यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच तिचे चाहते देखील सातत्याने कमेंट करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत १६ हजारापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

सोनाली मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची नायिका आहे. ती अभिनयासोबत उत्कृष्ट डान्स देखील करते. तिने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘महाराष्ट्राची डान्सिंग क्वीन’ हा रियॅलिटी डान्स शो जज देखील केला आहे. तिने ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी, ‘पोस्टर गर्ल्स’, ‘क्लासमेट’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा