गेल्या काही दिवसांपासून मराठमोळी ‘अप्सरा’ अर्थातच सर्वांची लाडकी सोनाली कुलकर्णी बरीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी अचानक लग्नाची बातमी देऊन, तिचे चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता आपला ‘मिनिमून’ साजरा करून झाल्यानंतर, सोनाली पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे. जवळपास दोन महिने एंजॉय करून, आता ती त्याच ऊर्जेने कामावर परतली आहे. नुकतेच तिने पोस्ट केलेले काही फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.
या फोटोमध्ये सोनाली पावसाळी वातावरणाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. तसेच यात तिने साडी परिधान केली आहे. नक्षीकाम असलेल्या या पिवळ्या गुलाबी रंगाच्या साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. यात ती नेहमी प्रमाणेच सुंदर दिसत आहे. साडी घालून ती ज्याप्रकारे फोटोसाठी पोझ देत आहे, ते पाहून चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडत आहेत.
या फोटोसोबतच त्याचे लक्षवेधी कॅप्शनही चर्चेत आलं आहे. कॅप्शनमध्ये तिने तिच्या काही आवडीच्या गोष्टींबद्दल सांगितलं आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “पाऊसाळी वातावरण…गारवा, हिरवळ, बोगनवेल, आणि साडी…माझ्या काही अत्यंत आवडीच्या गोष्टी.” फोटोवर कमेंट्स करून चाहते त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच अगदी कमी वेळातच या फोटोवर तब्बल ५७ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. (sonalee kulkarni shared her favourite things in mansoon see photos)
सोनालीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सोनाली अखेरच्या वेळेस ‘युवा डान्सिंग क्वीन’ या टीव्ही शोमध्ये, नृत्यदिग्दर्शक मयूर वैद्यसोबत जज म्हणून दिसली होती. ती ‘झिम्मा’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर, ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘फ्रेश लाईम सोडा’ हे आगामी चित्रपटही तिच्या खात्यात आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-