सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही ९० च्या दशकातील सर्वात चर्चित बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने तिने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. ९० च्या दशकात सोनालीच्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सर्वांनाच वेड लावले होते.आजही सोनालीची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत असते. आता लवकरच ‘द ब्रोकन न्यूज’ या चित्रपटातून सोनाली डिजिटल पदार्पण करणार असल्याची बातमी आली आहे. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर ती पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. अलीकडेच, तिने या सिरीजमधील पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामुळे सोनाली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘द ब्रोकन न्यूज’ वरून तिचा पहिला लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने “आज तुम्हाला आवाज भारतीच्या मुख्य संपादक अमिना कुरेशी यांच्याशी तुमची ओळख करून द्यायची आहे. काल्पनिक गोष्टींपेक्षा सत्य महत्त्वाचे आहे भलेही त्याच्यापाठीमागे कितीही पैसा असो. पाहा धक्कादायक आणि सत्य यांच्यातील लढाई, लवकरच ZEE5 वर” असा सुचक कॅप्शन दिला आहे.
या सिरीजमध्ये सोनाली बेंद्रे पत्रकाराची भूमिका साकारत आहे. ती पत्रकाराची भूमिका कशी साकारणार याची तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. सध्या ती तिच्या डिजिटल डेब्यू मालिकेचे जोरदार प्रमोशन करत आहे. याचे दिग्दर्शन विनय वैकुल करत आहे, ज्याने अलीकडेच नेटफ्लिक्स ‘आरण्यक’ या क्राईम थ्रिलरचे दिग्दर्शन केले आहे.
सिरीजची कथा मुंबईतील दोन प्रतिस्पर्धी वृत्तवाहिन्यांवर आधारित आहे. एक चॅनल ‘आवाज भारती’ आहे, जे एक स्वतंत्र, नैतिक वृत्तवाहिनी आहे आणि दुसरे ‘जोश 24/7’ हे सनसनाटी आणि आक्रमक पत्रकारितेसाठी ओळखले जाते. ही आगामी सिरीज Zee5 वर कधी प्रदर्शित होईल हे जाहीर करण्यात आलेले नाही. यामध्ये सोनालीसोबत जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराना, किरण कुमार यांच्यासह अनेक स्टार्स दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा