×

DID Lil Masters | सोनाली बेंद्रेला पहिल्यांदा पाहताच हरवून गेलता गोल्डी बेहल, शेअर केली लव्ह स्टोरी

‘डीआयडी लिटिल मास्टर्स सीझन ५’ या रियॅलिटी शोमध्ये प्रत्येक वीकेंडला खूप धमाल होते. शोचे जज म्हणून मौनी रॉय (Mouni Roy), रेमो डिसूझा (Remo D’souza) आणि सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मागच्या वेळीही जेव्हा रणवीर सिंग (Ranveer Singh) ‘जयेशभाई जोरदार’साठी आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh), अजय देवगण (Ajay Devgan) ‘रनवे ३४’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते, त्यावेळीही सेटवरील अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाले होते. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. यावेळी सेटवर सोनाली पती गोल्डी बहलसोबत स्टेज शेअर करताना दिसली.

खरं तर, यावेळी ‘डीआयडी लिटिल मास्टर्स ५’मध्ये लग्नाचा विशेष भाग दाखवला जाणार आहे. यावेळी सोनालीचा पती गोल्डी बहलही उपस्थित होता. दोघांनीही ‘आँखों में बसे हो तुम’ या गाण्यावर परफॉर्म केले. यानंतर गोल्डीने शोमध्ये त्यांची प्रेमकथाही सांगितली. तो म्हणाला, “आमच्या लग्नाला या नोव्हेंबरमध्ये २० वर्षे पूर्ण होतील आणि मी त्यासाठी खूप उत्सुक आहे. मला असे वाटते की, आपल्या स्वतःच्या मैत्रिणीशी लग्न करणे खूप छान आहे. माझ्या आयुष्यात सोनाली आली म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला अजूनही आठवतंय, जेव्हा मी सोनालीला तिच्या पहिल्या चित्रपटाच्या सेटवर पाहिलं. तेव्हा मी हरवून गेलो होतो.” (actress sonali bendre husband goldie behl reveal their love story)

View this post on Instagram

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

कोण आहे गोल्डी बहल?
गोल्डी बहल हा एक बॉलिवूड फिल्ममेकर आहे. त्याचे वडील रमेश बहल हे देखील दिग्दर्शक होते. गोल्डी बहलने ‘बस इतना सा ख्वाब है’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, सुष्मिता सेन मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. यानंतर त्याने ‘द्रोण’, ‘आय मी और मैं’, ‘लंडन पॅरिस न्यूयॉर्क’ सारखे चित्रपट केले, पण सर्वांची अवस्था वाईट होती. लग्नानंतर गोल्डी आणि सोनालीला एक मुलगाही झाला, त्याचे नाव रणवीर बहल आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post