×

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दुसऱ्यांदा करणार लग्न, ‘या’ ठिकाणी पार पडणार विवाह सोहळा

सध्या मराठी सिने जगतात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या मराठी चित्रपट जगतात लग्नाचा धुमधडाका पाहायला मिळत आहे. आता पून्हा एक अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अडकणार असून ही अभिनेत्री दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. ही अभिनेत्री आहे सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni). हो एका वर्षापूर्वीच कुणाल बेनोडेकरसोबत विवाहबद्ध झालेली सोनाली त्यांच्या लग्नाच्या वर्षपूर्तीनिमित्त पून्हा एकदा लग्न करणार आहे. ७ मे २०२१ ला त्यांचा विवाह सोहळा दुबईमध्ये पार पडला होता. या लग्नाला कोरोनामुळे खूप कमी लोकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आता हा लग्न सोहळा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

येत्या ७ मे रोजी सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. याचदिवशी ते पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. हा विवाह सोहळा लंडनमध्ये पार पडणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या लग्नाला अनेक कलाकार आणि त्यांच्या नातेवाईकांना यामध्ये सहभागी होता आले नव्हते. त्यामुळेच आता पुन्हा अगदी थाटामाटात हा  विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी सोनालीच्या वडिलांनी खरेदी केल्याचीही बातमी समोर आली आहे. या बातमीने सध्या तिच्या चाहत्यांसह सिने जगतात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोनालीने २०२१ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्या लग्नाची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती. मात्र त्यावेळी कोरोनामुळे हा लग्न सोहळा अत्यंत साधेपणात संपन्न झाला होता. आता मात्र धुमधडाक्यात लंडनमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. लग्नात मेहंदीचे आणि हळदीचे कार्यक्रमही रंगणार असून त्याची तयारीही सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अभिनेत्री सोनालीने ‘पांडू’, ‘मितवा’, ‘झिम्मा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post