×

‘शेर शिवराज’च्या टीमवर अमोल कोल्हेंनी घेतला आक्षेप, दिग्दर्शकाला मागावी लागली माफी

सध्या मराठी सिनेमागृहात दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या ‘शेर शिवराज’ चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने सध्या चांगलीच कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. याआधी दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंंड’, ‘फत्तेशिकस्त’, आणि ‘फर्जंद’ या चित्रपटांनी सिनेमागृहात जोरदार धुमाकूळ घातला होता. या चित्रपटांना प्रेक्षकांचा अभूतपुर्व प्रतिसाद पाहायला मिळाला. त्याचबरोबर सध्या त्यांचा शेर शिवराज चित्रपटही सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. अशातच एका पोस्टमुळे अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी ‘शेर शिवराज’चे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरवर नाराजी दर्शवली आहे. यावर दिग्पाल लांजेकरनेही माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.

दिग्पाल लांजेकरचा ‘शेर शिवराज’ चित्रपट सध्या सर्वत्र गाजत आहे. जगभरातील शिवप्रेमींना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. त्यामुळेच चित्रपटाने जोरदार कमाई करत, नवनवीन रेकॉर्ड निर्माण केले आहेत. चित्रपटावर प्रेक्षकांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. याचपैकी एका चाहत्याच्या प्रतिक्रियेमुळे हा वाद निर्माण झाला आहे. दिग्पाल लांजेकरने या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एका चाहत्याने लिहलेली पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये अमोल कोल्हेंबाबत बोलताना या चाहत्याने, “आजपर्यंत शिवराय म्हणजे मीच अशी कोल्हेकुई करणाऱ्यांना शिवराय कसे असतात हे चिन्मय मांडलेकरने दाखवून दिले आहे” अशी पोस्ट केली होती. याच पोस्टवर अमोल कोल्हे यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ शेअर करत, “आजपर्यंत मी शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंची भूमिका साकारताना नेहमीच त्या व्यक्तीमत्वांचा आदर केला असून मी कधीही कोणाच्या भूमिकेवर बोट ठेवले नाही. असे असताना ही पोस्ट करणाऱ्यांचे आणि शेअर करणाऱ्यांचे आभार.” अशा शब्दात आपला निषेध व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

View this post on Instagram

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

यावर दिग्पाल लांजेकरनेही तात्काळ माफी मागत, हा ‘व्हिडिओ पूर्ण न पाहताच सोशल मीडिया टीमकडून चुकून पोस्ट करण्यात आली’ असे म्हणत यावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post