Monday, July 1, 2024

वयाने १२ वर्षे लहान अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती सोनाली फोगाट, वाचा किस्सा

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. सोनाली आता या जगात नाही. गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ४३ वर्षीय सोनाली फोगटच्या निधनाने मनोरंजन आणि राजकारण जगताला मोठा धक्का बसला आहे. सोनाली हे एक प्रसिद्ध नाव असून सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती. इतकंच नाही तर, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. एकदा तिचे नाव १२ वर्षांनी लहान असलेल्या एका टेलिव्हिजन अभिनेत्याशी जोडले गेले होते, ज्याची खूप चर्चा झाली होती.

सोनाली फोगट टेलिव्हिवरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस १४’ चा भागत होती. या शोमध्ये टेलिव्हिजन अभिनेता अली गोनी (Aly Goni) देखील होता. इथे सोनालीला अली गोनीबद्दल भावना आल्या होत्या. याचा खुलासा स्वत: सोनालीने नॅशनल टेलिव्हिजनवर केला आहे. ती अनेकदा अली गोनीबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसली. एका मुलीची आई असून १२ वर्षांनी लहान असलेल्या अली गोनीच्या प्रेमात पडल्यामुळे तिला खूप ट्रोल करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

१२ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याकडे हृदय आले होते
शोमधून बाहेर पडल्यानंतर सोनाली फोगटने अली गोनीबद्दलच्या तिच्या भावना आणि लोकांकडून ट्रोल झाल्याबद्दल माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तिने मौन तोडले. अली गोनीबद्दल असलेल्या भावनाबाबत सांगताना त्या म्हणाल्या, ‘मला जे वाटलं ते मी सांगितलं. ही अगदी साधी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही अशा वातावरणात असता ज्या ठिकाणी तुमचं जवळचं असं कोणी सोबत नसतं. तेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल अशा भावना येतात.’

‘जर कोणी आपल्या मनातील भावना सर्वांसमोर मांडत असेल तर, त्या गोष्टी थट्टा न करता प्रशंसा करायला हवी. जेव्हा मी अली गेनीबद्दल भावना व्यक्त केल्या, तेव्हा मला ट्रोल करण्यात आलं….’ असं देखील सोनाली मुलाखतीत म्हणाल्या.

पतीच्या निधनानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले
सोनाली फोगटची लव्ह लाईफ समस्यांनी भरलेली होती. राजकारणात येण्यापूर्वी तिचे लग्न राजकारणी संजय फोगट यांच्याशी झाले होते, पण २०१६ मध्ये त्यांचे निधन झाले. यानंतर अभिनेत्रीने राजकारणात पाऊल ठेवले आणि नाव कमावले. त्याला एक मुलगीही आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा – KK Birth Anniversary | अगदी साधेसरळ होते गायकाचे आयुष्य, बालमैत्रिणीशी केला होता विवाह
वयाच्या १२ व्या वर्षीच सायरा यांना करायचे होते २२ वर्ष मोठ्या अभिनेत्याशी लग्न; रंजक आहे दिलीप कुमारांसोबत त्यांची ‘लव्हस्टोरी’
आलिया भट्ट लग्नाआधी रणबीर कपूरसोबत एकाच खोलीत का राहू लागली, ‘हे’ कारण आले समोर

हे देखील वाचा