Friday, April 25, 2025
Home कॅलेंडर भल्या भल्या अभिनेत्रींना मागे सारत सोनाली फोगटच्या ‘या’ डान्सने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, पाहाच

भल्या भल्या अभिनेत्रींना मागे सारत सोनाली फोगटच्या ‘या’ डान्सने चुकवला चाहत्यांच्या काळजाचा ठोका, पाहाच

हिंदी चित्रपट आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील अनेक अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांपेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. या अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नवनवीन फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असतात. या अभिनेत्रींमध्ये सोनाली फोगाटचे (Sonali Phogat) नाव सर्वप्रथम घेतले जाते.  सध्या अभिनेत्रीला सोनाली फोगाटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे ज्याची चर्चा रंगली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, ‘बिग बॉस 14’ मध्ये धमाल करणारी सोनाली फोगाट सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि आपले नवनवीन फोटो ती सोशल मीडियावरुन चाहत्यांशी शेअर करत असते. तिचे हे व्हिडिओ खूप पसंत केले जातात. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ जोरदार चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये सोनाली फोगट ‘ला ला ली ला ला’ या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करत आहे.

या गाण्यात तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला असून ट्रेंडिंग गाण्यावर ती थिरकत आहे. सोनाली फोगटची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. एका चाहत्याने लिहिले आहे की, “काय बात आहे, मॅम” तुम्ही इतर अभिनेत्रींना लोकांना नापास केले. तर आणखी एका चाहत्याने “सोनाली जी” अप्रतिम लिहिले आहे, तर अनेकांनी तिच्या या व्हिडिओचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. अशा प्रकारे सोनाली फोगट नेहमीप्रमाणे चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरली.

अभिनेत्री सोनाली फोगटने ‘अम्मा’ या टीव्ही शोमध्ये नवाब शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ‘बंदूक आली जटानी’ हरियाणवी गाण्यातही ती दिसली आहे. सोनालीने ‘द स्टोरी ऑफ बदमाजगढ’ या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. सोनाली ही भाजपची नेता आहे आणि तिच्या विधानांमुळे ती अनेकदा वादात सापडत असते. सोनालीला बिग बॉस 14 मधून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सीझनमध्ये ती दबंग स्टाईलमध्ये घराघरात पोहोचली. जास्मिन भसीन आणि रुबिना डिलेक यांच्यासह तिची खूप चर्चा झाली होती. या कार्यक्रमाने तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ केली होती. इतकंच नाही तर अली गोनीसोबतची तिची केमिस्ट्रीही यावेळी चांगलीच चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा