‘खूप घाण वाटत आहे…’ म्हणत ‘तेरे इश्क की दीवानगी’ गाण्यावर डान्स करणारी सोनाली फोगाट भलतीच ट्रोल

सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, ज्यावर अगदी लहान मुलांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सर्वजण सक्रिय असतात. आपल्या आयुष्यात घडणारी बारीक- सारीक गोष्ट, हटके फोटो आणि व्हिडिओ ते या माध्यमातून शेअर करत असतात. यामध्ये ‘बिग बॉस १४’ फेम सोनाली फोगाट हिचादेखील समावेश होतो. सोनाली आपले डान्स व्हिडिओ शेअर करून नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असते, पण यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. अशातच आता तिने आपला आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे तिला जोरदार ट्रोल केले जात आहे.

सोनालीने शुक्रवारी (११ जून) आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती ‘तेरे इश्क की दीवानगी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मात्र, कदाचित तिने असा विचारही केला नसेल की, आपल्याला या व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागू शकतो.

https://www.instagram.com/p/CP-phgKnWHA/?utm_source=ig_web_copy_link

तिच्या या व्हिडिओवर काही युजर्स तिच्या कौतुकाचे पूल बांधत आहेत. असे असले, तरीही नेटकरी तिला जोरदार ट्रोल करत असून व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्ला देत आहेत.

सोनाली फोगाटच्या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “कमीत कमी वय तरी लक्षात घेत जा.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “पाहायला खूप घाण वाटत आहे. हे चुकीचे आहे. कृपया व्यवस्थित कपडे घाला.” याव्यतिरिक्त आणखी एका युजरने लिहिले की, “मूर्ख दिसत आहेस.” अशाप्रकारे युजर्सनी तिला सल्ले दिले आहेत.

सोनाली फोगाट ही भाजपची नेता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत तिने हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. तथापि, ती निवडणूकीत पराभूत झाली. सोनाली फोगट ही एक अभिनेत्रीही आहे. तिने दूरदर्शनवर बरेच शो होस्ट केले आहेत. याव्यतिरिक्त ती टिक टॉक स्टारही आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी

-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

Latest Post