बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही गोंडस बाळाची आई बनल्यापासून चांगलीच चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. तिने सोशल मीडियाद्वारे मुलगा झाल्याची माहिती दिली. कपूर कुटुंबात सध्या बाळाच्या आगमनाने खूपच आनंदी वातावरण आहे. अशात सोनमने बाळ झाल्यानंतर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी सोनम कपूर (Sonam Kapoor) नुकतीच एका मुलाची आई झाली आहे. तिने कपूर कुटुंबाला आनंदाची बातमी दिली आहे. सध्या सोनमच्या मुलाचे स्वागत करण्यासाठी कपूर कुटूंबाने जोरदार तयारी केली. सोनमच्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत आणि यामध्येच सोनमने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये सोनम आरशासमोर थांबली आहे आणि पोझ देत आपला बेली फॅट दाखवत आहे. प्रेग्नेंसीनंतर सोनम खूपच बदललेली दिसत आहे.
सोनमने या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाची जेगिन्स घातली आहे. तसेच तिने काळ्या रंगाचा ओवरसाईज शर्ट घातला आहे. तिने चश्मा घालून केस खुले सोडले आहेत. या फोटोंमध्ये ती एकदम ‘कूल मॉम’ दिसत आहे. ही व्हिडिओ क्लिप शेअर करत असताना सोनमने सांगितले होते की, “मी अजूनही मॅटरनिटी कपडे घालत आहे.” व्हिडिओमध्ये सोनम बोलत आहे की, “पोट आतमधी नाही गेले पण, हेही छान दिसत आहे.”
सोनम आणि आनंद आहुजा यांनी 20 ऑगस्टला मुलाच्या आगमनाची बातमी पूर्ण जगाला दिली होती. त्यांनी लिहिले होते की, “आम्हाला माहित आहे की, आमचे पूर्ण आयुष्य बदलणार आहे.”
सोबतच अनिल कपूर यानेही आपल्या सोशल मीडियाद्वारे आजोबा बननार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. सध्या सोनम कपूरच्या मुलाचे नाव ठरवले नाही. आजोबा अनिल कपूरने सांगितले की, मुलाचे नाव ‘k’ अक्षरावरून ठेवले जाणार आहे. मात्र, तात्पुरते मुलाला ‘सिंबा’ या नावाने बोलत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एक-दोन नाही, तर पवन कल्याणने ३ वेळा थाटलाय संसार; संपत्तीचा आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी!
कार्तिक आर्यनचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, ‘एका फ्लॉप सिनेमाने माझे करिअर संपेल…’
कपिल शर्मानंतर मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात दीपिकाची एंट्री, लूक पाहून चाहते फिदा