Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड सोनम कपूरने केले मॅटर्निटी फोटोशूट, काळ्या ड्रेसमध्ये खूपच मनमोहक दिसतेय अभिनेत्री

सोनम कपूरने केले मॅटर्निटी फोटोशूट, काळ्या ड्रेसमध्ये खूपच मनमोहक दिसतेय अभिनेत्री

सध्या बॉलिवूड जगतातील अनेक अभिनेत्री लवकरच गुड न्यूज देण्याच्या तयारीत आहेत. कॉमेडियन भारती सिंग पाठोपाठ छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देबीना बॅनर्जीनेही बाळाला जन्म दिला आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनम कपूरनेही आपल्या प्रेग्रेंसीची सोशल मीडियावरुन माहिती दिली होती. त्यामुळे आता लवकरच कपूर कुटूंबात पाळणा हलणार असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. नुकतेच सोनम कपूरने (Sonam Kapoor)  तिचे बेबी बंप फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री सोनम कपूर सध्या प्रेग्नेंसीचा आनंद घेताना दिसून येत आहे. २१ मार्चला सोनम कपूरने सोशल मीडियावरुन तिच्या प्रेग्नेंसीची माहिती शेअर केली होती. तेव्हापासून सोनम नवनवीन फोटोशूट करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोनमचे बेबी बंप प्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा सोनमने मॅटरनिटी फोटोशूट केले आहे ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन सोनमने हे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे. वेगवेगळ्या पोजमधील पाच फोटो सोनमने पोस्ट केले आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये तिचा काळ ड्रेस आणि केसांची आकर्षक स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे या फोटोवर सोनमच्या चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. याआधीही सोनम कपूरने पती आनंद आहुजासोबत फोटोशूट केले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले होते. दरम्यान अभिनेत्री सोनम कपूरने उद्योजक आनंद अहुजासोबत मार्च २०१८ मध्ये लग्न केले होते. त्याआधी सोनमने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. यामधला सोनमचा रांझणा चित्रपट चांगलाच गाजला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा