Thursday, July 18, 2024

बाळासोबत पहिल्यांदाच स्पॉट झाली भारती सिंग, फोटो शेअर करून सांगितले झोपेचे हाल!

भारती सिंग (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachhiyaa) यांचे आयुष्य त्यांच्या मुलाच्या आगमनामुळे आनंदाने भरले आहे. या जोडप्याने काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलाचे स्वागत केले होते. कॉमेडियन भारती सिंग आई झाल्यापासून प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे. आपल्या मुलासोबत आयुष्याचा हा नवीन टप्पा सुरू करताना तिला खूप आनंद झाला आहे. पण प्रत्येक सामान्य मुलीप्रमाणे तिचे आयुष्यही आई झाल्यानंतर बदलले आहे, ज्याचा खुलासा तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर करून केला आहे.

बाळाने उडवली भारतीची झोप!
भारती सिंगने तिचा एक व्लॉग शेअर केला आणि तिच्या वेदनादायक गर्भधारणेच्या टप्प्याबद्दल सांगितले. त्याचवेळी भारती सिंगने खुलासा केला आहे की, तिच्या झोपेची चांगलीच वाट लागली आहे. वास्तविक, भारतीने इन्स्टा स्टोरीजवर एक फोटो शेअर केला आणि लिहिले, “आता झोप नाही, फक्त जागायचंय.” तिच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट होते की, ती आता रात्र जागून आपल्या लाडक्या मुलाची काळजी घेत आहे आणि आईचे कर्तव्य चोख बजावत आहे. (bharti singh shares new photos from hospital after welcoming baby boy)

आठवले घरचे जेवण
भारती सिंगने हॉस्पिटलच्या जेवणालाही बाय-बाय म्हटले आहे. तिने हॉस्पिटलच्या बेडवरून आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये जेवण ठेवलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करत भारतीने लिहिले की, “याहू….. आता बाळाची आई घरी जेवण करेल!”

डॉक्टरांना म्हटली ‘सुपरस्टार!’
भारतीने डिस्चार्ज होण्यापूर्वी तिच्या प्रसूती डॉक्टरांना बाय म्हटलं आणि त्यांच्यासोबत सेल्फीही घेतला. या फोटोमध्ये भारती आणि तिचे डॉक्टर दिसत आहेत. भारतीने या फोटोला “सुपरस्टार डॉक्टर!” असे कॅप्शन दिले आहे.

भारतीला मिळाला डिस्चार्ज
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आई झालेल्या भारती सिंगला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतरचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना भारती आणि हर्षने पॅपराझींना पोजही दिली. या फोटोंमध्ये हर्षच्या हातात लहान बाळही दिसत आहे, पण त्याचा चेहरा दिसत नाहीये.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा