अरे देवा! सोनम कपूरने गळ्यात घातला चक्क काटेरी नेकलेस, पाहून उंचावतील तुमच्याही भुवया


बॉलिवूडची फॅशन डिवा म्हणून ओळखली जाणारी सोनम कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोनम तिच्या चाहत्यांसाठी बरेच सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बऱ्याच दिवसांपासून ती फिल्मी दुनियेपासून दूर असली, तरी सोशल मीडियावर आजही ती अधिराज्य गाजवते. सोनम तिच्या सुंदर फोटोंनी चाहत्यांना भुरळ पाडण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, पण त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

सोनम कपूर सध्या भारतापासून दूर लंडनमध्ये तिचा पती आनंद आहुजासोबत राहत आहे. या काळातही अभिनेत्री तिची फॅशनची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर सादर करत असते. आजही तिची स्टाइल सगळ्यात अनोखी आणि खास आहे. दरम्यान, सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर नवीन फोटो अपलोड केले आहेत, ज्यामध्ये तिचा हॉट लूक समोर आला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने तिच्या खास स्टाइलमध्ये अनेक पोझ दिल्या आहेत. ड्रेसबद्दल बोलायचे झाले, तर सोनम कपूरने डीप नेकमध्ये स्टायलिश ड्रेस घातला आहे. पण यावर तिने निराळा नेकपीस देखील घातला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. (sonam kapoor wore thorn necklace photos gone viral)

सोनम कपूर तिच्या एका बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे, या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने तिची हॉट स्टाईल दाखवली आहे, जे पाहून चाहत्यांना अक्षरशः घाम फुटला आहे. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनमने डीप नेक ब्रालेट घातला आहे, तर या स्किन कलरच्या ब्रालेटमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. शिवाय तिच्या काटेरी नेकलेसही चांगल्याच चर्चा रंगवल्या आहेत.

फोटोशूटमध्ये सोनमने तिचे केस मोकळे ठेवले आहेत, ज्यामुळे लूक आणखीनच ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो अपलोड होताच चाहत्यांनीही कमेंट करायला सुरुवात केली. अनेक चाहत्यांना हा फोटो आवडत असतानाच, अनेकजण तिला ट्रोल देखील करत आहेत. तिला ट्रोल करत एका यूजरने लिहिले, “तुला काय दाखवायचे आहे…?”

तसेच, सोनम कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती तिच्या वडिलांच्या ‘एके वर्सेस एके’ या वेब सीरिजमध्ये शेवटची दिसली होती. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर ती २०१९ मध्ये ‘झोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता


Latest Post

error: Content is protected !!