Wednesday, June 26, 2024

आलिया भट्टपासून ते सोनम कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींचे नयनरम्य किचन डेकोरेशन पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे!

असे म्हणतात की, मनुष्याच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो आणि म्हणूनच स्वयंपाक मनापासून व्हायला पाहिजे. स्वयंपाक मनापासून तेव्हाच होईल, जेव्हा तुम्हाला स्वयंपाकघर आवडेल आणि स्वयंपाकघर तुम्हाला तेव्हाच आवडेल जेव्हा ते खूप खास, युनिक आणि शानदार असेल. किचनच्या प्रेमात पडायचे असेल, तर बॉलिवूडच्या या अभिनेत्रींच्या किचन डेकोरेशनवर एक नजर टाकाच.

आलिया भट्ट
खाण्याचा छंद असणाऱ्या आलियाचे किचन पाहिले, तर तुम्हालाही ते खूप आवडेल. या किचनमधील पांढर्‍या भिंती आणि रॅकमुळे हे खूपच मॉड्यूलर वाटते. खूप सुंदर कॅबिनेट्ससह बरीच मोकळी जागा, हे आलियाच्या किचनचे वैशिष्ट्य आहे.

प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही मॅनहॅटनमधील तिच्या डुप्लेक्स अपार्टमेंटचे किचन एकदा चाहत्यांसमोर सादर केले होते. एका मुलाखतीदरम्यान तिचे किचन पाहण्याची संधी मिळाली होती. प्रियांकाच्या किचनचे वैशिष्ट्य म्हणजे, काचेचे कॅबिनेट, उच्च डिझाइनची मायक्रोवेव्ह, लांब आणि मोठया कॅबिनेट्स. तिचे किचन पाहून हे लक्षात येते की, किचन घरातील एक महत्त्वाचा भाग आहे.

सोनम कपूर
बरीच मोकळी जागा, ग्रॅनाइट स्लॅब, काचेचे कॅबिनेट्स, एकूणच सोनम कपूरचे मॉड्यूलर किचन हे प्रत्येक महिलेचे स्वप्न आहे. सोनमच्या किचनमधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, ते बागेला लागूनच आहे. याचे अनेक दरवाजे आणि खिडक्या बागेत उघडल्या जातात.

दिया मिर्झा
अभिनेत्री दिया मिर्झाच्या किचनमध्ये जाऊन तुम्हाला अशा गोष्टी समजतील, ज्याचा फायदा केवळ तुम्हालाच नाही तर समाजालाही होतो. दियाने तिच्या किचनच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसून येते की, तिने प्लास्टिक वापराऐवजी पर्यावरणपूरक अशा गोष्टी वापरण्यावर भर दिला आहे. तिच्या किचनमध्ये, आपल्याला निसर्गाशी संबंधित अधिक गोष्टी आढळतील.

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हाच्या मुंबईतील अपार्टमेंटचे किचन खरोखरच विलक्षण आहे. सोनाक्षीचे किचन बर्‍यापैकी मस्त आणि थंड रंग देऊन सजलेले आहे.

याचे वैशिष्ट्य म्हणजे, यातील बसण्याच्या जागा, ज्याला रेस्टॉरंटचा लूक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनेक रात्र रस्त्यांवर उपाशी काढलेला रेमो, आज आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर, वाचा त्याची संघर्षमय कहाणी

-लतादीदींचा सल्ला न ऐकणे हरिहरन यांना पडले होते महागात, १०लाख लोकांसमोर ओढवला होता महाकठीण प्रसंग

-‘हम युपी से है भैया!’ उत्तर प्रदेशातील असे कलाकार, ज्यांचं नाव घेतल्याशिवाय बॉलीवूडचं पानही हलत नाही

हे देखील वाचा