अभिनय क्षेत्रामध्ये सर्वच अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या नवनवीन लूकने चाहत्यांची मने घायाळ करत असतात. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांना हटके अंदाजामध्ये पाहायला खूप आवडते. बॉलिवूडची फॅशनेस्टा म्हणून ओळखली जाणारी सोनम नेहमी तिच्या वेगवेगळ्या लुक्समुळे प्रकाशझोतात येते. विविध लूक अतिशय सुंदर पद्धतीने कॅरी करताना दिसते. अशात सध्या सोनम कपूरचा एक नवा लूक व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर खूप सक्रिय असणाऱ्या सोनमने नुकताच तिच्या नवीन लुकचे फोटो सोशल एमडीयावर पोस्ट केले आहे. या लूकमध्ये सोनमने सोनेरी रंगाचा कुर्ता आणि धोती घातली असून, यावर तिने सोनेरी रंगाचेच जॅकेट घातले आहे. गळ्यामध्ये नेकलेस, कानामध्ये आकर्षक गोल आकाराचे कानातले, हातात अंगठ्या तिने घातल्या आहेत. शिवाय ती मेसी हेअर स्टाईल आणि नो मेकअप लूकमध्ये अधिकच सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या या नवीन लूकला भरपूर पसंती दिली आहे.
कुणाल रावलच्या ‘विजन क्वेस्ट प्रेजेंटेशन’ साठी तिने हा अनोखा लूक केला आहे. तिचा हा अनोखा लूक ‘इंडिया कोर्टर वीक’ अंतर्गत ‘एफडीसीआय’च्या दुसऱ्या डिजिटल पर्वासाठी आहे. तिने हे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “मुंबई वरील प्रेमासाठी”. ‘इंडियन मेल ट्रॅडिशनल लूक’ला सोनमने अशा पद्धतीने चार चांद लावले आहेत.
सोनमच्या या लुकवर तिच्या वडिलांनी म्हणजेच अनिल कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल कपूर कमेंट करत म्हणाले की,”खुप छान फोटो, सोनम”. त्याच बरोबर अर्पिता मेहता, सैय्यामी खेर, पत्रलेखा, सिद्धांत कपूर, तारा शर्मा यांनी देखील तिच्या या लूक साठी कमेंटमध्ये हार्ट ईमोजी पाठवले आहेत.
सोनम तिच्या अभिनयाने चित्रपटांमध्ये तिला अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु ती नेहमीच तिच्या वेगळ्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. सोनमला काही लूकमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला आहे. परंतु ती याकडे लक्ष न देता आपल्या नवीन आणि हटके लूकने चाहत्यांची मने जिंकत असते. तिच्याकडे फॅशनचा ‘रीसॉन’ नावाचा ब्रँड देखील आहे. तिची बहीण रिया कपूर बरोबर ती या ब्रँडचे कामकाज पाहते.
तसेच काही दिवसांपूर्वी सोनम कपूरची बहीण रिया कपूर लग्नगाठीत अडकली. रियाच्या लग्नाला सोनमचे पती आनंद देखील हजर होते. त्यावेळी तिने लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तेव्हा अनेकांनी ती गरोदर असल्याचा अंदाज बांधला होता. परंतु यावर तिच्या घरच्यांनी आणि तिने देखील काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सध्या तिच्या हटके लूकचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश
-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ