बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. सोनम कपूर आणि आनंद आहुजा हे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. दोघेही सतत एकमेकांसोबतचे प्रेमाने भरलेले क्षण सोशल मीडियावर शेअर करून, व्यक्त होत असतात.
सोनम कपूरने तिचा लव्ह पार्टनर आनंदच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोनम तिच्या पतीसोबत खूप रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे. तर, दुसरीकडे सोनमने फोटोच्या कॅप्शनमध्ये देखील प्रचंड भावनिक पोस्ट लिहिली आहे.
सोनमने पती आनंद आहुजासाठी लिहिलेली इमोशनल नोट
शुक्रवारी ३० जुलै रोजी आनंद आहुजा याने त्याचा 38 वा वाढदिवस साजरा केला आहे. पतीचा वाढदिवस रोमँटिक आणि खास बनवण्यासाठी सोनमने एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत सोनम कॅप्शनमध्ये लिहिले की, “तू खूप प्रेमळ, प्रामाणिक आणि सुंदर आहेस…मी तुझ्यावरून माझी नजरच हटवू शकत नाही. प्रेम, संयम आणि दयाळूपणा जे काही आहे, हे ते तू मला समजावून दिल्याबद्दल खूप धन्यवाद! मी खूप लकी मुलगी आहे. मी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडले. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना आणि प्रत्येक दिवस तुला तुझ्या ध्येयाकडे घेवून जावो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
यात सोनम कपूर पतीसोबत खूप रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे. सोनमने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बेड रूमपासून ते प्लेन, जिम, स्ट्रीट आणि पार्कपर्यंत आनंदसोबत घालवलेले क्षण तिने शेअर केले आहेत. दोघांच्या जबरदस्त बॉन्डची झलक व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये सोनम आनंदला किस करत त्याचे केस व्यवस्थित करत आहे. तर कधी जिममध्ये त्याच्यासोबत वर्कआऊट करताना दिसत आहे.
सोनमचे लग्न
सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद आहुजा याच्यासोबत लग्न केले आहे. आज ते एकमेकांसोबत सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद लुटत आहेत. सोनम नुकतीच लंडनहून भारतात परतली आहे. मात्र, आनंद अजून देखील लंडनमध्येच आहे.
दरम्यान, सोनम कपूर सध्या चित्रपटांमधून ब्रेक घेऊन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोनम कपूरच्या आगामी चित्रपटबद्दल बोलायचं झालं, तर सोनमचा आगामी चित्रपट ‘ब्लाइंड’ आहे. या चित्रपटात सोनम एका सीरियल किलरच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अंध पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. २०१९ मध्ये सोनम तिच्या शेवटच्या ‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटात दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










