आहा! ईशा कोप्पीकरही झाली ट्रेंडमध्ये सामील, ‘पावरी हो रही है’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ

isha koppikar copied pavari girl and share video on instagram


अभिनेत्री ईशा कोप्पीकर कदाचित सध्या अभिनय आणि हिंदी चित्रपटांपासून दूर असेल, पण सोशल मीडियावर ती खूप सक्रिय राहते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये शेअर करत असते. एवढेच नव्हे, तर सोशल मीडियावर ईशाची चांगली फॅन फॉलोविंग आहे. हेच कारण आहे ज्यामुळे तिचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट होताच, व्हायरल होऊ लागतात.

नुकतीच ईशा एका पार्टीत स्पॉट झाली होती. जिथून तिने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या मैत्रिणीसह एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ईशा प्रसिद्ध पावरी गर्लची कॉपी करताना दिसत आहे.

ईशाचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरलाय. चाहते व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. यात अभिनेत्री तिच्या खास मैत्रिणींसोबत दिसली आहे. प्रत्येकाच्या हातात एक पान आहे. त्या सगळ्या म्हणतात की, “हे आम्ही आहोत, हे आमचे पान आहेत आणि इथे पावरी होत आहे.”

यातील ईशाचा मनमोहक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे आणि यामुळे तिचे बरेच कौतुकही होत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना ईशाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “आताच तर पार्टी सुरू झाली आहे.”

ईशाने राम गोपाल वर्माच्या गँगस्टर ड्रामा ‘कंपनी’तील खल्लास गाण्यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ईशा संजय गुप्ताच्या ‘इश्क समुंदर’ या गाण्यात दिसली. यापूर्वी तिने अनेक तमिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये अभिनय करून लोकांची मने जिंकली आहेत.

ईशाने ‘कृष्णा कॉटेज’, ‘डरना मना है’, ‘क्या कूल है हम’, ‘मैने प्यार क्यूं किया?’, ’36 चायना टाउन’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट हा 2011 चा ‘शबरी’ चित्रपट होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बुसीट चॅलेंज’ फॉलोव करत दीपिका पदुकोणने केला व्हिडिओ शेअर; ‘दीपवीरचा’ निराळा डान्स होतोय व्हायरल

-एकदम कडक! अमायरा दस्तूरने केला चक्क हील्स घालून डान्स; व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस

-‘नाही सलवार रंगब…’, होळीवरील नवीन भोजपुरी गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, एकाच दिवसात लाखो हिट्स


Leave A Reply

Your email address will not be published.