‘अरे कोणीतरी एसी लावा रे’, मलायका आणि नोराचा डान्स पाहून टेरेन्सचे वक्तव्य, तुम्हीही पाहा हॉट व्हिडिओ

Nora Fatehi and Malaika Arora dance on India's dancers stage


मलायका अरोरा आणि नोरा फतेेही या दोघीही बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर आहेत. मलायका मागच्या दोन दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, तर नोरा मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रात आहे. असं खूप कमी वेळा होतं की, दोन डान्सिंग क्वीन एकाच मंचावर उपस्थित असतात. परंतु असं झालं होतं, ते म्हणजे मलायका आणि नोरा एका मंचावर होत्या. त्या दोघांनी एकत्र डान्स देखील केला होता.

खरं तर इंडियाज बेस्ट डान्सरच्या मंचावर या दोघीही आल्या होत्या. या शोमध्ये नोरा काही दिवस जजच्या भूमिकेत होती. तिच्या या भूमिकेत प्रेक्षकांना ती खूपच आवडत होती. या मंचावर मलायका आणि नोरा एकमेकींच्या गाण्यावर डान्स करण्याची फर्माईश प्रेक्षकांकडून आली होती, तेव्हा त्या दोघींनी डान्स केला होता.

या व्हिडिओमध्ये नोराने मलायकाच्या ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यावर, तर मलायकाने नोराच्या ‘दिलबर’ या गाण्यावर डान्स केला होता.

त्यांचा हा डान्स बघून टेरेन्स लुईस म्हणाला होता की, “अरे कोणीतरी एसी लावा रे.” या दोन्ही डान्सरला आजपर्यंत कोणीच एका मंचावर पाहिले नव्हते. पण इंडियाज डान्सच्या निम्मितने या दोघी एकत्र दिसल्या.

गेल्या काही दिवसांपासून त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करताना दिसत आहे. या दोघीही या व्हिडिओमध्ये त्यांचा बोल्ड आणि हॉट अंदाजात डान्स करताना दिसत आहे.

मलायका तिच्या करिअरच्या सुरुवातीला अनेक व्हिडिओ साँगमध्ये दिसली होती. तिची ही गाणी खूपच लोकप्रिय झाली होती. नोरा देखील अनेक डान्स व्हिडीओमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आहा! ईशा कोप्पीकरही झाली ट्रेंडमध्ये सामील, ‘पावरी हो रही है’ म्हणत शेअर केला मजेदार व्हिडिओ

-‘बुसीट चॅलेंज’ फॉलोव करत दीपिका पदुकोणने केला व्हिडिओ शेअर; ‘दीपवीरचा’ निराळा डान्स होतोय व्हायरल

-एकदम कडक! अमायरा दस्तूरने केला चक्क हील्स घालून डान्स; व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.