Monday, July 15, 2024

आलियासाठी तिची आई असणाऱ्या सोनी राजदान यांनी केला त्यांच्या ‘या’ स्वप्नाचा त्याग

 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचे ही सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे नाव टॉप अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. ती एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेते. आलियाने तिच्या करिअरची सुरूवात करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटामधून केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. या चित्रपटात नंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने अनेक चांगल्या आणि दर्जेदार चित्रपटात कामे केली. आईवडील आपल्या मुलांसाठी खूप त्याग करतात. काही वेळेस त्यांचा त्याग दिसून येतो तर काही वेळेस नाही. अभिनेत्री सोनी राजदान अर्थात आलिया भट्टच्या आई यांनी देखील लेकीसाठी असाच एक मोठा त्याग केला, ज्यामुळे आलियाचे करिअर घडले.

या गोष्टीचा खुलासा सोनी राजदान यांनी नुकताच एका मुलाखतीत केला. लवकरच सोनी यांची ‘कॉल माय एजेंट’ नावाची एक वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच सोनी राजदान यांना एका मुलाखतीदरम्यान एक प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘वेबसिरीजच्या शूटिंगदरम्यान असा क्षण आला का, ज्यामुळे तुम्हांला जाणीव झाली की, अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीत काम करण्यासाठी खूप त्याग करावा लागतो? यावर त्या म्हणाल्या की, “मी आलियासाठी माझे खूप मोठे स्वप्न सोडून दिले. मी तिच्यासाठी जास्त कधी काही केले नाही. परंतु ‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटाच्या वेळी ती तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात करत होती, त्यावेळी मलासुध्दा एका चित्रपटाची शूटिंग सुरु करायची होती.”

पुढे त्या म्हणाल्या की, “त्यावेळी मी एक चित्रपट दिग्दर्शित करणार होते. परंतु आलियाच्या निर्मात्यांची इच्छा होती की, तिची शूटिंग संपेपर्यत मी तिच्यासोबत रहावे. त्यावेळी आलिया फक्त १७ वर्षाची होती आणि अशा परिस्थितीमुळे मला माझा चित्रपट दिग्दर्शित करणे थांबवावे लागले होते. नंतर प्रोड्यूसरची इच्छा असल्यामुळे मी तिच्यासोबत थांबले होते.”

सोनी राजदान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून, आजही त्या आपल्याला चित्रपटांमध्ये दिसतात. आलिया सोनी राजदान यांच्या खूप जवळ आहे. ती अनेकदा अटींच्या आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
शहनाज गिलची मोहक अदा, पाहा फोटो
सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी खूप हावरट झालीये…

हे देखील वाचा