Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याने बिहारपासून केला सायकलवर प्रवास, अभिनेत्याने फोटो शेअर करून मानले आभार

सोनू सूदला भेटण्यासाठी चाहत्याने बिहारपासून केला सायकलवर प्रवास, अभिनेत्याने फोटो शेअर करून मानले आभार

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा चांगलाच चर्चेत आहे. त्याची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. कोरोना काळात त्याने जी काही मदत केली आहे, त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये खूप वाढ झाली आहे. अशातच सोनू सूदने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एक सायकल दिसत आहे. ज्यावर होर्डिंग लावलेले आहे. यावर सोनू सूदचे तीन वेगवेगळे फोटो लावलेले आहेत. होर्डिंगला तिरंगा लावलेला आहे. हा फोटो शेअर करून सोनू सूदने सांगितले की, ही सायकल त्याच्या घराबाहेर उभी आहे आणि या सायकलवर एक व्यक्ती बिहारपासून त्याच्या घरापर्यंत त्याला भेटायला आला आहे.

सोनू सूदने हा फोटो शेअर करून लिहिले की, “जेव्हा तुम्ही या दृश्यासोबत उठता. एक व्यक्ती सायकलवर बिहारपासून येथे आला आहे.” यामध्ये त्याने हात जोडण्याची ईमोजी पोस्ट करून त्या व्यक्तीचे आभार मानले आहे. मागच्या वर्षी कोरोना काळात सोनू सूदने प्रवाशी कामगारांना त्यांच्या घरी पोहचवले होते यात बिहारमधील कामगारांचा समावेश होता. (Sonu Sood shared a photo of cycle a man came on a bicycle all the way from bihar)

सोनू सूदला सर्वत्र देवमाणूस अशी ओळख मिळाली आहे. लॉकडाऊनमध्ये त्याने अनेकांची मदत केली आहे. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकतेच काही दिवसांपूर्वी तो ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर पोहचला होता. यावेळी त्याने अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील डायलॉग देखील बोलला होता. त्याचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याच्याकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. तो अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यातील सोनू सूदच्या लूकला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती

-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा

-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…

हे देखील वाचा