सोनू सूद हा जरी एक अभिनेता असला तरी कोरोनाच्या काळात त्याने गरजू आणि गरीब जनतेला केलेल्या मदतीमुळे त्याला देवदूत किंबहुना देव अशी उपाधी जनतेने बहाल केली आहे. कोरोनाच्या काळात अभिनेता सोनू सूद सातत्याने सर्व गरजू आणि गरीब लोकांना मदत करताना दिसला. आज जरी कोरोना कमी झाला असला, तरी त्याची मदत चालूच आहे. अगदी ऑक्सिजनपासून ते रुग्णालयातील बेड, औषधं, व्हेंटिलेटर इथंपर्यंत सर्व गोष्टी गरजू लोकांना पुरवण्याचे काम केले आहे.
कोरोना काळात सोनूच्या मदतीमुळे अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. त्याच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेकांनी सोनूची प्रत्यक्ष भेट घेऊन, त्याच्याप्रती त्यांचे प्रेम आणि आदर व्यक्त केला आहे. आतापर्यंत असंख्य लोकांनी त्याची भेट घेतली आहे. गरीब लोकांनी विविध मार्गानी मुंबईत येत सोनूची भेट घेतली. नुकताच एक व्यक्ती १२०० किलोमीटर सायकलचा प्रवास करून सोनूला भेटायला आला. त्याने त्याच्या सायकलवर सोनूचा मोठा फोटो लावला होता. तो व्यक्ती येताना सोबत हार आणि फुल घेऊन आला होता.
ही व्यक्ती सोनूच्या घराजवळ पोहचल्यानंतर, सोनू स्वतः त्याला भेटायला आला. सोनू आल्यानंतर त्या व्यक्तीने सर्वात आधी त्याच्या पायावर फुल वाहिली आणि त्याच्या गळ्यात हार घातला. यानंतर सोनुने त्याचे हात जोडून स्वागत केले. ती व्यक्ती चप्पल न घालता १२०० किलोमीटर सायकल चालवत आली होती. हे सोनूला समजल्यानंतर सोनुने त्याच्यासाठी चप्पलची सोय केली.
हे पहिल्यांदा झाले नाहीये की, सोनूला भेटायला कोणी असे आले आहे. याआधी देखील एक माणूस हैदराबादवरून ७०० किलोमीटरचा प्रवास करून आला होता. त्या व्यक्तीचे नाव रघु होते. सोनुने रघुसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले होते की, “रघु हैदराबादवरून सायकलवर ७०० किलोमीटरचा प्रवास करून, मुंबईत रात्री ११ ला पोहचला. तर एक व्यक्ती पायी चालत आला होता. तुम्ही माझ्याबद्दल जे प्रेम दाखवत आहात, ते व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीये. मी तुम्हाला नम्र विनंती करतो की, असे काही करून तुमचे अनमोल जीवन धोक्यात घालू नका.” रघूच्या आधी व्यंकटेश नावाचा व्यक्ती सोनूला भेटायला आला होता.
काही दिवसांपूर्वीच सोनुने नेल्लोरच्या सरकारी दवाखान्यात ऑक्सिजन प्लांट लावला आहे. शिवाय सोनू तमिळनाडु, पंजाब, उत्तराखंड, तेलंगाना, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये १६ प्लांट लावणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ये हवायें, गुनगुनाए, पूछे तू है कहाँ!’ शिवानी बावकरच्या दिलखेचक अंदाजावर चाहते फिदा
-कॅटरिना कैफ अन् विक्की कौशल लवकरच लग्न करणार?? सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलोकडून मिळाले संकेत










